पिंपरी : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्ण दगावला असा आरोप करून रूग्णाच्या एका नातेवाईकाने डॉक्टरवर हल्ला केला. रूग्णालयात वापरात येणाऱ्या ब्लेडने डॉक्टरवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान रूग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करत डॉक्टरला मारहाण केली. यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. संत तुकारामनगर येथील खासगी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी या प्रकरणी रूग्णालयाबाहेर आंदोलन केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन गायकवाड (वय २६ रा. पिंपरी) या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रूग्णाच्या नातेवाईकांनी अशा प्रकारे डॉक्टरवर हल्ला करणे चुकीचे आहे. त्यांची काही तक्रार असेल तर रितसर पोलिसांकडे दाद मागणे गरजेचे होते. त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. रूग्णालयातील डॉक्टरांनी एकत्रित येऊन रूग्णालयाच्या आवारात या घटनेचा निषेध नोंदविला. दुपारी डॉक्टरांच्यावतीने संत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली. डॉक्टरांना संरक्षण मिळावे, अशीही मागणी करण्यात आली. येणाऱ्या , मुळे
रूग्णाच्या नातेवाईकाची डॉक्टरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 18:03 IST
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्ण दगावला असा आरोप करून रूग्णाच्या एका नातेवाईकाने डॉक्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरवर उपचार सुरू आहेत.
रूग्णाच्या नातेवाईकाची डॉक्टरला मारहाण
ठळक मुद्देसंत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार दाखल