वायसीएममधील परिचारिकांचा नाही संपात सहभाग

By Admin | Updated: June 15, 2016 05:02 IST2016-06-15T05:02:22+5:302016-06-15T05:02:22+5:30

अनेक दिवसांपासून शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिका १५ व १६ जूनला संपावर जाणार आहेत.

Participation in the no-nonsense campus of YCM | वायसीएममधील परिचारिकांचा नाही संपात सहभाग

वायसीएममधील परिचारिकांचा नाही संपात सहभाग

पिंपरी : अनेक दिवसांपासून शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिका १५ व १६ जूनला संपावर जाणार आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या परिचारिकांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याने हा संप पुकारण्याची वेळ आली असल्याचे महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी सांगितले आहे. यामध्ये राज्यभरातून २० हजार परिचारिका सहभागी होणार आहेत.
मात्र, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात याबाबत कोणत्याही प्रकारचे परिपत्रक किंवा आदेश मिळाला नसल्याने वायसीएममधील परिचारिका कामावर रुजू असणार आहेत. (प्रतिनिधी)


राज्यव्यापी संप असला, तरी याबाबत कोणत्याही प्रकारचे पत्रक किंवा सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे परिचीरिकांचे कामकाज सुरळीत होणार आहे. संपाचा परिणाम पालिकेतील रुग्णालयांवर होणार नाही.
- डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधीक्षक

Web Title: Participation in the no-nonsense campus of YCM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.