लोणावळा : कोळी, आग्री, सीकेपी, सोनार या समाजाची कुलस्वामिनी व घाटाखालील नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवीचे आज मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी दर्शन घेतले. मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदार संघ व रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल हे विधानसभा मतदार संघ येतात. रायगड जिल्ह्यात एकविरा देवीवर श्रध्दा असणारा मोठा वर्ग असल्याने व मतदार संघातील एकविरा हे जागृत देवस्थान असल्याने पार्थ पवार यांनी आज सकाळी नऊ वाजता कार्ला गडावर येऊन एकविरा देवीची पुजा केली, आशीर्वाद घेत विजयाचा कौल मागितला.
पार्थ पवारांनी घेतले कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 11:48 IST