शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी देण्याचा बनाव करुन पार्लर चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 11:18 IST

पार्लरमध्ये नोकरी देण्याचे नाटक करून फेशिअलचे ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मालकानं 16 वर्षीय  मुलीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : पार्लरमध्ये नोकरी देण्याचे नाटक करून फेशिअलचे ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मालकानं 16 वर्षीय  मुलीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर त्यानं मोबाइलवर चित्रिकरण करून कामाला ये नाहीतर व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेलदेखील केले. अल्पवयीन मुलीला वारंवार धमकावणाऱ्या नराधमाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

सराफत बरकतअल्ली खान (वय २४ वर्ष) असे पार्लर चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (१४ मे) रात्री त्याला वाकडमधून अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे वाकड पार्लर आहे.  कामासाठी दोन मुली पाहिजेत, असे त्याने शेजारच्या काही दुकानदारांना सांगितले होते. माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलगी तेथे कामाला गेली मात्र आरोपीने तुझे ट्रायल घ्यावे लागेल, असे म्हणत तिला पार्लरवरील कंपार्टमेंटमध्ये नेऊन फेशिअल करायला लावले. यावेळी त्याने एका ठिकाणी मोबाइल लपवून ठेऊन रेकॉर्डिंग सुरू केले. फेशिअल करत असताना आरोपीने पीडितेला मिठी मारून लगट करीत बळजबरी केली अन् घडला प्रकार कोणाला सांगितल्यास सर्वांना रेकॉर्डिंग दाखवेन, अशी धमकी दिली.

यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी कामावर न आल्याने आरोपी पुन्हा तिला कामावर येण्यासाठी धमकी दिली. तिच्यासोबत झालेला प्रकार आणि त्याचे वारंवार येणारे फोन यामुळे पीडित मुलगी मानसिक तणावात गेली. तिने घरी याबाबत काहीही सांगितले नाही. या सर्व प्रकाराला कंटाळून तिनं दोन दिवसांपूर्वी घर सोडलं व आता ती बेपत्ता झाली. याबाबत तिच्या वडिलांनी तक्रारदेखील दिली. नातेवाईकांच्या मदतीनं पीडित मुलीचा शोध घेण्यात आला. यानंतर पीडित मुलीच्या आई-वडील बहिणीने घडला प्रकार पोलिसांपुढे कथन केला. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, सुनिल पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. 

टॅग्स :Molestationविनयभंग