शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

स्मार्ट सिटीत पॅनसिटी आराखडा , समितीची बैठक २० मिनिटांत गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 2:35 AM

पिंपरी-चिंचवड सिटी लिमिटेड कंपनीच्या (स्मार्ट सिटी) संचालक समितीची दुसरी बैठक शुक्रवारी सकाळी महापालिका भवनात झाली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड सिटी लिमिटेड कंपनीच्या (स्मार्ट सिटी) संचालक समितीची दुसरी बैठक शुक्रवारी सकाळी महापालिका भवनात झाली. केवळ वीस मिनिटांत बैठक उरकण्यात आली. पॅनसिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटचा आराखडा (डीपीआर) करण्यासंदर्भातील सल्लागार विषयास मंजुरी देण्यात आली. स्मार्ट सिटीतील कामांच्या निविदा प्रक्रिया डिसेंबरपर्यंत करण्याविषयी चर्चा झाली.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्यानंतर पहिली बैठक रद्द झाली होती. त्यानंतर १८ आॅगस्टला पहिली बैठक झाली होती. त्या वेळी समितीसमोर कोणतेही महत्त्वाचे विषय नसल्याने पंचवीस मिनिटांत बैठक उरकण्यात आली होती. त्यात ‘एसपीव्ही’ची स्थापना आणि नवीन मुख्याधिकारी नियुक्त होईपर्यंत आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्तीही केली होती.महापालिका भवनात शुक्रवारी सकाळी ११ वाजताची बैठकीची वेळ होती. अध्यक्ष आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर हे बैठकीपूर्वीच उपस्थित होते. त्यानंतर महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे, सदस्य प्रमोद कुटे, नगरसेवक सचिन चिखले, उपमुख्याधिकारी नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते.तर केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर. एस. सिंग यांचे विमान हुकल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. काही सदस्य वेळेवर उपस्थित न राहिल्याने अकराची बैठक साधारण साडेअकराला सुरू झाली. तत्पूर्वी सदस्यांनी डॉ. करीर यांच्याशी संवाद साधला. ही बैठक ११.५० वाजता संपली. वीस मिनिटांच्या बैठकीत अजेंड्यावर अकरा विषय होते. त्यापैकी चार विषय हे तांत्रिक होते, तर तीन विषय कार्यालयीन कामकाजासंदर्भात होते. पॅनसिटी डीपीआर आणि पुणे स्मार्ट सिटीने वाहतूक नियोजनाविषयी पाठविलेल्या विषयावर चर्चा झाली.पॅनसिटी निविदा महिनाभरातआयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंट आणि एरिया बेस डेव्हलपमेंटसाठी प्रपोजल मॅनेजमेंट युनिट तयार करण्याविषयी सूचना देण्यात आल्या. डीपीआरचे काम पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन केले आहे. सल्लागार संस्थांबरोबरच निविदा पूर्व बैठक झाली आहे. तसेच सल्लागार नियुक्त झाल्यानंतर विषयानुसार पुढील तज्ज्ञ नियुक्तीसंदर्भात महिनाभरात यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल. त्यानंतर समितीची संमती घेऊन कार्यवाहीचे नियोजन आहे. स्मार्ट वाहतूक नियोजन, पाणी व्यवस्थापन, वायफाय, वाहतूक नियोजन, स्मार्ट पार्किंग करण्याचे नियोजन आहे.’’