शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

निगडित पलटी झाला गॅस टँकर, जीवितहानी नाही; गॅस काढण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 10:39 IST

महामार्ग वर दापोडी ते निगडी दरम्यानच्या रस्त्यावर ग्रेड सेपरेटर तयार केलेला आहे.

पिंपरी : मुंबईकडून पुण्याकडे जाताना निगडीतील मधुकर पवळे उड्डाण पुलाच्या अलीकडच्या वळणाच्या भागावर, गॅस टँकर पलटी होण्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या ठिकाणी अग्निशामक दलाचे आणि एलपीजी कंपनीचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. एका टँकर मधून दुसऱ्या तांकर्मधे गॅस काढण्याचे काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातून पुणे मुंबई जुना राष्ट्रीय महामार्ग जातो. 

महामार्ग वर दापोडी ते निगडी दरम्यानच्या रस्त्यावर ग्रेड सेपरेटर तयार केलेला आहे, त्यामुळे या मार्गाने ट्रक, टँकर अशी जड वाहने ही जा करत असतात. या मार्गावर ग्रेड सेपरेटर तसेच उड्डाणपूल उभारलेले आहेत.  तसेच. बाहेर दोन लेन, बिआरटी, आणि ग्रेड सेप्रेटर मध्ये दोन लेन आहेत. ग्रेड सेपरेटर मध्ये आत व ग्रेड सेपरेटर मधून बाहेर येण्यासाठी इन आऊट काढण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

मुंबईहून पुण्याकडे येताना पवळे उड्डाणपुलाच्या अलीकडेच पहाटे  साडेतीन वाजता एक गॅस वाहतुक करणारा बीपीसीएल कंपनीचा टँकर पलटी झाला. त्यानंतर पंधरा मिनिटातच निगडीतील अग्निशामक दलाचे पथक दाखल झाले. एकापाठोपाठ पाच अग्निशामक पाच अग्निशामक दलकाची दलाची पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी गॅस कंपनीचे कर्मचारी अधिकारी वर्गही दाखल झाले.

महापालिकेची अग्निशमन विभाग ४ टीम तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी  विजय थोरात,  अग्निशमन अधिकारी  श्री चिपाडे,  आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल; महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, पोलीस उपायुक्त विवेक पाटील ,सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व इतर पन्नास पोलीस   इत्यादी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

गॅस स्थलांतरित करण्याचे काम सुरू

सुरुवातीला टँकर पलटी झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली त्यानंतर अधिकाऱ्यांच्या व अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत गॅस गळती होत आहे की नाही याबाबत तपासणी करण्यात आली सकाळी सव्वा आठ वाजल्यापासून टँकर मधले गॅस ट्रान्सफर करण्याचे काम सुरू झालेले आहे. सध्या गॅस ट्रान्सफर करणेसाठी वाहने आलेली असून कार्यवाही सुरू आहे. अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी विजयकुमार थोरात म्हणाले, ''कशामुळे झाला टँकर पलटी कशामुळे झाला.  याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सध्या अपघातग्रस्त टँकर मधून दुसऱ्या वाहनांमध्ये स्थलांतरित करण्याचे काम सुरू झालेले आहे या भागातील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.''

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड