चिमुकल्यांचे बहारदार नृत्य

By Admin | Updated: February 22, 2017 02:45 IST2017-02-22T02:45:58+5:302017-02-22T02:45:58+5:30

संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण उत्साहात पार पडले. जय हो,जय अंबे अंबे, हिरवा निसर्ग

Outstanding dance of the little girls | चिमुकल्यांचे बहारदार नृत्य

चिमुकल्यांचे बहारदार नृत्य

काले : संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषक वितरण उत्साहात पार पडले. जय हो,जय अंबे अंबे, हिरवा निसर्ग अशा विविध गाण्यांच्या तालावर चिमुकल्यांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमात नृत्य नाटिकेचा अंतर्भाव होता. शिवगर्जना हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब आॅफ निगडी अध्यक्षा डॉ. शुभांगी कोठारी, हिमांशू योगी, हरबिदरसिंग दुल्लड, महेश दोशी ट्रस्टचे कांतीलाल दोशी, रसिकलाल दोशी, भावना मोदी, मनीष मोदी, भारती दोशी, उषा मुदलियार, गणेश गायकवाड, महादेव कालेकर, काले गावच्या सरपंच वैशाली आढाव, संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव कालेकर, सचिव लक्ष्मण भालेराव, उपाध्यक्ष पोपट कालेकर, संचालक डॉ. संजय चौधरी, संचालिका विद्या गांधी, कोथुर्णे गावचे उपसंरपच अंकुश सोनवणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव भालेराव यांनी केले. बाळू कदम व रेखा दळवी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी आभार
प्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सोनवणे यांच्यासह सोनल गांधी, नीता कालेकर, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर, संध्या शिंदे,अनघा दीक्षित, अरुणा साबळे, रेखा दळवी, सुप्रिया रोडे, साजिद तांबोळी यांनी विशेष प्रयत्न केले.(वार्ताहर)

Web Title: Outstanding dance of the little girls