शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

उपसूचनांतून नियमबाह्य ४४६ निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:36 IST

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सभा शाखेच्या नियमानुसार महापालिकेचे सभागृह चालवित नाही. नियमबाह्य उपसूचनांचा स्वीकार केला जात आहे. अशा सुमारे ७० कोटींच्या ४४६ निविदा नियमबाह्य असून त्या रद्द कराव्यात.

पिंपरी : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सभा शाखेच्या नियमानुसार महापालिकेचे सभागृह चालवित नाही. नियमबाह्य उपसूचनांचा स्वीकार केला जात आहे. अशा सुमारे ७० कोटींच्या ४४६ निविदा नियमबाह्य असून त्या रद्द कराव्यात. अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठवू असा इशारा विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दिला आहे. ‘सुसंगत उपसूचना न घेता सत्ताधाºयांच्या चुकीच्या कामांना महापालिका आयुक्तही पाठीशी घालत आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे.मागील महिन्यांतील सर्वसाधारण सभा ही उपसूचनांच्या मुद्यांवरून गाजली होती. उपसूचना स्वीकारणार नाही, या धोरणाचा पोलखोल विरोधीपक्षनेत्यांनी केला होता. त्या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली होती. विरोधीपक्षनेते यांनी उपसूचनांचा मुद्दा पकडून आकडेवारीसह माहिती माध्यमांना दिली. बहल म्हणाले, ‘‘अत्यंत मनमानी पद्धतीने सभागृहाचे कामकाज सुरू आहे. हाच पारदर्शक कारभार? असा प्रश्न उपस्थित होतो. पारदर्शक कारभार असेल, तुम्ही जर चांगले काम करीत असाल तर विरोधकांना का बोलू दिले जात नाही? मुस्कटदाबी का केली जाते. बोलणाºयांचे माईक बंद करा, असे आदेश देतात. ही बाब चुकीची आहे.२० जूनच्या सभेमध्ये विषय पत्रिकेवर सात क्रमांकाचा विषय हा स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यासाठी अनुदान अदा करण्याचाविषय अवलोकनाचा होता. या विषयास २०१७-१८ च्या सुमारे चार हजार आठशे कोटींच्या अंदाजपत्रकाचे ब्लॅकेट प्रशासकीय मान्यतेसाठी सभागृहात घाईघाईने चुकीच्या पद्धतीने उपसूचना देण्यात आली. ती मान्यही केली. संबंधित उपसूचना सभाशास्त्र आणि सभा नियम कामकाज हे सभा नियम क्रमांक ३९ नुसार सुसंगत नाही. मूळ विषय वेगळा आणि अंदाजपत्रकांची मंजुरीची उपसूचना हे तर्कसंगत नाही. ही उपसूचना ग्राह्य धरणारी नाही. अशा चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आलीआहे. स्थापत्य, विद्युत, उद्यान अशा तीन विभागातील सुमारे सत्तर कोटींच्या ४४६ निविदा रद्द करण्याची गरज आहे.’’आयुक्तांचे दुर्लक्षमहासभेत बोलून न दिल्याने उपसूचनाबाबत २५ जुलैला आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले होते. त्यानंतर पुन्हा २८ जुलैला स्मरणपत्र दिले होते. मात्र, त्यांनी अजूनही उत्तर दिलेले नाही, खुलासाही दिला नाही. त्यावरून आयुक्तही सत्ताधाºयाच्या आणि प्रशासनाच्या चुकीच्या कामांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप बहल यांनी केला आहे.