शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीसह परिसरात अन्य पास केंद्र बंद;विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:46 IST

- निगडी पास केंद्रावर अतिरिक्त ताण येत असल्याने कर्मचारी हैराण, केंद्रावर पास काढण्यासाठी तळवडे, निघोजे, मोई, रावेत, पुनावळेतील प्रवाशांची गर्दी, वाढीव काउंटर सुरू करावे अशी मागणी

- रामहरी केदारचिखली : शहरातील नागरिकांच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका निभावणारी म्हणून ‘पीएमपी’चा उल्लेख केला जातो. दररोज लाखो नागरिक आपली उपजीविका भागवण्यासाठी ‘पीएमपी’च्या प्रवासाचा आधार घेतात. मात्र, चिखलीसह शहरातील इतर ठिकाणी असलेले पास केंद्र नियमित सुरू नसल्याने विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.

चिखली येथून दररोज शहरातील विविध ठिकाणी ‘पीएमपी’ बसच्या १२९ फेऱ्या होतात. या बसमधून हजारो प्रवासी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करावा लागतो. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीसह उत्तम सेवा मिळावी म्हणून ‘पीएमपी’ प्रशासनाकडून पास सुविधा राबवली जाते. मात्र, पास केंद्र बंद असल्याने प्रवाशांना नाहक मानसिक त्रासासह अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

चिखलीसह इतरही पास केंद्र नियमित सुरू नसल्याने निगडी पास केंद्रावर चिखली, तळवडे, निघोजे, मोई, रावेत, पुनावळे या परिसरातील प्रवासी पास काढण्यासाठी निगडी केंद्रावर गर्दी करतात. त्यामुळे येथील केंद्रावर अतिरिक्त ताण येत असल्याचे पीएमपीएल पास केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. इतर ठिकाणची पास केंद्र सुरू करावीत व निगडी पास केंद्रावर वाढीव काउंटर सुरू करावे, अशी मागणी प्रवासी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आमच्याकडे मनुष्यबळ कमी होते म्हणून चिखली येथील पास केंद्र आठवड्यातील दोन दिवस सुरू असायचे. सध्या मनुष्यबळ वाढले असून लवकरच चिखलीसह इतर ठिकाणी असलेली पास केंद्र नियमित सुरू ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. - विकास मते, पीएमपी, पास विभागप्रमुख चिखली येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पीएमपीएल प्रशासनाने चिखली येथील पास केंद्र नियमित सुरू ठेवावे. अनेक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना पास मिळवण्यासाठी निगडीतील पास केंद्रावर तासनतास ताटकळत थांबावे लागते. - विनायक मोरे, सामाजिक कार्यकर्ते, चिखली

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड