सामाजिक, मनोरंजक कार्यक्रमांचे होणार आयोजन
By Admin | Updated: July 15, 2016 00:12 IST2016-07-15T00:12:17+5:302016-07-15T00:12:17+5:30
महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महापौर शकुंतला धराडे यांनी सांगितले.

सामाजिक, मनोरंजक कार्यक्रमांचे होणार आयोजन
पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महापौर शकुंतला धराडे यांनी सांगितले. या वेळी सामाजिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.
महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या नियोजनाबाबत स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. विधी समिती सभापती नंदा ताकवणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासूळकर, ब प्रभाग अध्यक्षा आशा सूर्यवंशी, क प्रभाग अध्यक्षा शैलजा शितोळे, फ प्रभाग अध्यक्षा मंदाकिनी ठाकरे, मनसे गटनेते अनंत कोऱ्हाळे, नगरसदस्या सुमन नेटके, प्रल्हाद सुधारे, जयंती महोत्सव समिती अध्यक्ष सुनील भिसे, रामदास जंगम, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, धनंजय भिसे, वसंत वावरे, अण्णा कसबे, मनोज तोरडमल, युवराज दाखले आदी उपस्थित होते. स्वागत प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी केले.
मार्गदर्शक कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, निबंध, वक्तृत्व, नृत्य, रांगोळी, वेशभूषा स्पर्धा घेण्यात याव्यात. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात येऊन तेथे वृक्षारोपण करण्यात यावे. महोत्सवाचे नियोजन वेळेत करण्यात यावे, असे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)