शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Fraud: 'फ्लिपकार्ट’चा विश्वासघात; ब्रँडेड वस्तू मागवून बनावट वस्तू केल्या परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 10:20 IST

विश्वासघात करून (Flipkart) कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसाांनी एक

ठळक मुद्देएकूण नऊ लाख ३५ हजार ४४० रुपयांचे साहित्य मागवले

पिंपरी : ब्रँडेड वस्तू मागवून त्याच्या जागी बनावट वस्तू ठेऊन फ्लिपकार्ट (Flipkart) कंपनीला परत पाठविल्या. विश्वासघात करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी २५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसाांनी एकाला अटक केली. डांगे चौक, वाकड येथे २७ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. 

पुनित चावळेकर (सौरभ जगदीश नामदेव), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह राजू भाई, अनिल रावत, रोहित सोनवणे आणि अन्य २१ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुलाब शंकर काटे (वय ३९, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲपल कंपनीचे एअरपोड वायरलेस, वायरसह, चार्जरसह तसेच वन प्लस ब्ल्यूटुथ हेड सेट या वस्तू ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान आरोपींनी डांगे चौक, थेरगाव येथे फ्लिपकार्ट डॉट कॉम या वेबसाईटवरून मागवल्या. आरोपींनी यूजर आयडी व मोबाईल क्रमांकाचा वापर करून एकूण नऊ लाख ३५ हजार ४४० रुपयांचे साहित्य मागवले. वस्तू मागवून आरोपींनी त्या परत केल्या. कंपनीने आरोपी ग्राहकांना त्यांनी मागवलेल्याच वस्तू दिल्या होत्या, मात्र आरोपींनी खोडसाळपणे मागवलेल्या वस्तूंच्या जागी बनावट वस्तू ठेवून त्या परत केल्या. फ्लिपकार्ट कंपनीचा विश्वासघात करून आरोपींनी फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीFlipkartफ्लिपकार्टonlineऑनलाइनcyber crimeसायबर क्राइम