शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर अत्याचार; चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:27 IST

औंध येथील एका खासगी कंपनीत साफसफाईचे काम करणा-या महिलेवर त्याच कंपनीतील सुपरवायझर, व्यवस्थापक व अन्य दोघांनी वेळोवेळी अत्याचार केले. कधी खोलीत डांबून ठेवून, तर कधी मारुंजीतील जंगलात नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

पिंपरी - औंध येथील एका खासगी कंपनीत साफसफाईचे काम करणा-या महिलेवर त्याच कंपनीतील सुपरवायझर, व्यवस्थापक व अन्य दोघांनी वेळोवेळी अत्याचार केले. कधी खोलीत डांबून ठेवून, तर कधी मारुंजीतील जंगलात नेऊन चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. १८ दिवसांच्या कालावधीत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार झाले.गुदरलेल्या प्रसंगाची तिने हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. आरोपींवर बलात्कार, तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेन ऊर्फ संबू राजू तुरिया (वय २०, मूळचा आसाम, सध्या रा. हिंजवडी), अजय जगदीश तिवारी (वय ३५, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मारुंजी), निपीन, टारझन अशी आरोपींची नावे आहेत. जितेन तुरिया हा पीडित महिला काम करते त्या कंपनीत सुपरवायझरचे काम करतो. तर अजय तिवारी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो. पीडित महिला मूळची गुजरात, अहमदाबाद येथील असून, एक वर्षापासून ती पती व चार मुलींसह मारुंजीत राहत होती. जितेन तुरिया याने महिलेला घरभाडे देण्याचे आमिष दाखविले. तिला रिक्षात बसवून बावधन परिसरातील एका खोलीत नेले. धमकावून तिच्यावर बलात्कार केला.दुसºया दिवशी कात्रज परिसरातील एका सदनिकेत नेले. तेथे डांबून ठेवून वेळोवेळी जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार २४ डिसेंबर २०१७ ते १२ जानेवारी २०१८पर्यंत सुरू होता. १२ जानेवारीला आरोपी जितेन याचे मित्र निपीन व टारझन यांनी तिला मोटारीत बसवून मारुंजीतील जंगलात नेले. तेथे चाकूचा धाक दाखवून त्यांनी तिच्यावर अत्याचार केले. ५ मार्चला पीडित महिलेने हिंजवडी पोलिसांकडे आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. त्यामुळे गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा