शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून चालढकल करत दोन दिवसांत उचलला केवळ निम्माच कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 14:39 IST

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लाल बहादूर शास्त्री भाजीमंडईत कचरा साचला आहे. त्यामुळे येथे ‘रोगट’ वातावरण आहे.

ठळक मुद्दे केवळ दिखाव्यासाठी कचरा उचलण्यात आल्याचे निदर्शनास दुर्गंधीने भाजीपाला विक्रेते, अन्य व्यावसायिक आणि ग्राहक त्रस्त महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा उचलण्याची सूचना

पिंपरी : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लाल बहादूर शास्त्री भाजीमंडईत कचरा साचला आहे. त्यामुळे येथे ‘रोगट’ वातावरण आहे. त्यासाठी येथील कचरा उचलण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार गुरुवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा उचलण्यात आला. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी येथील कचरा पूर्णपणे उचलला नाही. केवळ दिखाव्यासाठी कचरा उचलण्यात आल्याचे दिसून येत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून चालढकल केली जात आहे. परिणामी अद्यापही मंडईत कचरा साचला आहे. त्याच्या दुर्गंधीने भाजीपाला विक्रेते, अन्य व्यावसायिक आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत.संबंधित ठेकेदाराने गुरुवारी कचरा उचलण्यासाठी यंत्रणा कामास लावली. मात्र तरीही येथील कचरा पूर्णपणे उचलण्यात आला नाही. संबंधित कर्मचाऱ्यांनी केवळ काही कचरा उचलला. त्यामुळे उर्वरित कचरा अजूनही मंडईत पडला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील कचरा संकलनाचे काम नवीन ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. मात्र असे असले तरी शहरातील कचरा समस्या कायम आहे.शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर कचरा दिसून येतो. तसेच कचराकुंड्या ओसंडल्या आहेत. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाऊस पडत आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप ठोस कार्यवाही होत असल्याचे दिसून येत नाही. अशीच परिस्थिती पिंपरीतील भाजीमंडईत आहे. येथील कचराकुंडी ओसंडत आहे. कचरा सर्वत्र पसरला आहे. हा कचरा उचलण्याबाबत कर्मचारी उदासीन आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक, विक्रेते, ग्राहक आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे...........पिंपरीतील भाजीमंडईत आणि परिसरात सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे येथे स्वच्छता आवश्यक आहे. मात्र पाऊस झाल्याने आरोग्य विभागाने येथील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी तीन दिवसांत कचरा कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी झाली. याचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कचरा उचलण्याची सूचना करण्यात आली. ........पिंपरीतील भाजीमंडईत दोन दिवसांत ७० टक्के कचरा उचलला आहे. पहिल्या दिवशी बुधवारी जेसीबीच्या साह्याने कचरा उचलला. त्यानंतर गुरुवारी कर्मचाऱ्यांनी दोन ट्रक कचरा उचलला. उर्वरित कचरा रात्री उचलण्यात येईल.- महादेव शिंदे, सहायक आरोग्य अधिकारी, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGarbage Disposal Issueकचरा प्रश्नHealthआरोग्य