वृद्ध कलाकारांना आॅनलाईन पेंन्शन !

By Admin | Updated: July 5, 2016 18:10 IST2016-07-05T18:10:15+5:302016-07-05T18:10:15+5:30

पुणे जिल्ह्यापाठोपाठ आता टप्प्याटप्याने राज्यातील इतर जिल्हयांमधील वृद्ध कलाकारांना आॅनलाईन पेंन्शन योजना सुरू करण्याच्या दिशेने शासनाने पावली उचलली आहेत.

Online Pensions for Old Artists! | वृद्ध कलाकारांना आॅनलाईन पेंन्शन !

वृद्ध कलाकारांना आॅनलाईन पेंन्शन !

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ५ : पुणे जिल्ह्यापाठोपाठ आता टप्प्याटप्याने राज्यातील इतर जिल्हयांमधील वृद्ध कलाकारांना आॅनलाईन पेंन्शन योजना सुरू करण्याच्या दिशेने शासनाने पावली उचलली आहेत. येत्या महिन्याभरात सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर अशा चार जिल्ह्यांमधील सुमारे पाच हजार कलावंतांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन जमा होणार आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यासह रत्नागिरी, धुळे, मुंबई उपनगर,पालमपूर अशा आठ जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना आॅनलाइन पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे.

संचालनालयाकडून जिल्हा परिषदेला पेन्शनसाठी निधी देण्यात येत असे, तो पंचायत समितीमार्फत वृद्ध कलावंतांना दिला जात असे, पण ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ असल्याने पेन्शन आॅनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी बँक आॅफ महाराष्ट्रच्या सहकार्याने काम सुरू असून, ते ८० टक्के पूर्ण झाले आहे.
एका महिन्यात काम पूर्ण करून पेन्शन आॅनलाइन पद्धतीने द्यायला सुरुवात होईल,अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहाय्यक संचालक अमिता तळेकर यांनी दिली.

राज्य शासन राज्यातील २१ हजार ज्येष्ठ कलावंतांना दर चार महिन्यांनीपेन्शन देते. ए, बी, सी या श्रेणीत राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरीय या पद्धतीने ह्यअह्ण श्रेणी असलेल्या कलावंतांना २,१५० रुपये, ह्णबह्ण श्रेणी असलेल्या कलावंतांना १८००, तर ह्यकह्ण श्रेणी असलेल्या कलावंतांना १५०० रुपये प्रति महिना पेन्शन चार महिन्यांतून दिली जाते. वृद्ध कलाकारांना जिल्हा
परिषद व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पेन्शन पूर्वी दिली जायची. त्यासाठी कलावंतांना जिल्हा परिषद व बँकेत जावे लागायचे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकाराने आॅनलाइन पेन्शन योजना सुरू झाली. मात्र खाते क्रमांक व माहितीची पडताळणी करताना अडचणी येत असल्याने कलावंतांना आठ-आठ महिने या पेन्शनपासून वंचित राहावे लागत
होते. यातील अडथळे काही प्रमाणात दूर करण्यात यश आले असून पुणे जिल्ह्यापाठोपाठ सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यात आॅनलाइन पेन्शन योजना सुरू होणार आहे.
----------
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व सांस्कृतिक संचालनालातर्फे वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या नेमण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी बैठका घेऊन कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र समित्या यासाठी काम पाहत आहेत.

----------------
राज्यात पेन्शनधारक वृद्ध कलावंत-२१ हजार 

पुण्यातील पेन्शनधारक वृद्ध कलावंत-११५०


सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यातील कलावंत- ५०००

Web Title: Online Pensions for Old Artists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.