शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

ऑनलाइन फसवणूक झालेल्या कंपनीला परत मिळाले ६५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 19:21 IST

बनावट ई-मेलद्वारे घातला होता गंडा 

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलचे यश : बनावट ई-मेलद्वारे घातला होता गंडा 

पिंपरी : ई-मेल आयडीमध्ये एका अक्षराचा बदल करून एका कंपनीला ई-मेल केला. तसेच बँक बदलली असून नवीन बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून फसवणूक केली. मात्र, ही बाब लक्षात येताच याबाबत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलने विदेशातील बँकेशी संपर्क साधून ६५ लाख रुपये संबंधित कंपनीला परत मिळवून दिले.   सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील पिनॅकल इक्विपमेंट प्रा. लि. या कंपनीचे जर्मनी येथील कंपनीसोबत नियमित व्यवहार होत होते. जर्मनीतील कंपनीच्या मुंबई येथील प्रतिनिधीमार्फत सदरचे व्यवहार होत होते. त्यामुळे पिनॅकल इक्विपमेंट कंपनीच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवरून मुंबई येथील प्रतिनिधीच्या कार्यालयीन मेल आयडीवर मालाच्या व पेमेंटच्या संदर्भात नियमित ई-मेल होत होते. दि. १६ मार्च २०२० रोजी पिनॅकल इक्विपमेंट कंपनीच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवर जर्मनीतील कंपनीच्या मुंबई येथील प्रतिनिधीच्या मेल आयडीसारखाच दिसणाºया; परंतु थोडासा बदल केलेल्या फेक मेल आयडीवरून सदरची कंपनी त्यांची बँक बदलत असल्याचा ई-मेल आला. मुंबई येथील प्रतिनिधीच्या कार्यालयीन ई-मेल आयडीवर नियमित ई-मेल होत असल्याने पिनॅकल कंपनीच्या प्रतिनिधीने आलेल्या ई-मेलचा आयडी व्यवस्थित न बघता, नवीन बँकेच्या डिटेल्स पाठविण्याबाबत संबंधितास कळविले. त्यानंतर फेक ई-मेल आयडीवरून जर्मनीतील बँकेमध्ये पेमेंट करण्यास सांगितले. त्यानुसार दि. २० मार्च २०२० रोजी पिनॅकल कंपनीच्या बँक खात्यावरून जर्मनीतील बँकेच्या खात्यावर ६५ लाख ६७ हजार ७८० रुपये इतकी रक्कम पाठविली. परंतु जर्मन कंपनीच्या मुंबई येथील प्रतिनिधीने त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे पिनॅकल कंपनीच्या प्रतिनिधीने ई-मेल तपासला असता, संबंधित ई-मेलच्या आयडीमधील एका अक्षरामध्ये बदल केला असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली. ई-मेल आयडी हॅक न होता, अज्ञात आरोपीने मुंबई येथील प्रतिनिधीच्या ई-मेल आयडीसारखाच दिसणारा बनावट ई-मेल आयडी तयार केल्याचे सायबर सेलच्या लक्षात आले. त्यामुळे तत्काळ जर्मनीतील बँकेशी संपर्क साधून हा व्यवहार थांबविण्याबाबत कळविले. त्यानंतर ६४ लाख ७७ हजार २९० रुपये पिनॅकल कंपनीच्या बँक खात्यावर परत करण्यात आली.सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख, पोलीस कर्मचारी अतुल लोखंडे, भास्कर भारती, मनोज राठोड, नीतेश बिचेवार, विशाल गायकवाड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, वैशाली बर्गे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

अडीच लाख रुपये मिळविले परत लॉकडाऊन काळात नागरिकांची आॅनलाइन फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. अशा नागरिकांना त्यांचे दोन लाख ५१ हजार ५४ रुपये परत मिळवून देण्यात पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे. अशा पद्धतीने एकूण ६७ लाख २८ हजार ३४४ रुपये रिफंड झाले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcyber crimeसायबर क्राइम