अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:09 IST2018-02-12T16:08:34+5:302018-02-12T16:09:21+5:30
जुना मुंबइ- पुणे महामार्गावर खामशेत गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई येथील दुचाकीस्वार युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जुना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
कामशेत : जुना मुंबई-पुणे महामार्गावर खामशेत गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई येथील दुचाकीस्वार युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
मृताचे नाव नामदेव महादेव घोलप (वय ३०, रा. नवी मुंबई ठाणे) असे आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रविवार दि. ११ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या पूर्वी नामदेव महादेव घोलप हा जुना मुंबई पुणे महामार्गाने दुचाकीने (क्र. एमएच १४ इ जे २५९९)ने प्रवास करीत असताना खामशेत गावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्याला कामशेत मधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरु असताना रात्री अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.