बँकेच्या खात्यातून एक लाख काढून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 19:59 IST2019-07-27T19:57:38+5:302019-07-27T19:59:10+5:30
बँक कर्मचारी बोलत असल्याचे भासवून डेबिट कार्ड सुरू करण्यासाठी ओटीपी नंबर सांगा, असे म्हणून एकाच्या बँक खात्यातून १ लाख ८ हजार ४७६ रुपये काढून घेतले.

बँकेच्या खात्यातून एक लाख काढून फसवणूक
पिंपरी : बँक कर्मचारी बोलत असल्याचे भासवून डेबिट कार्ड सुरू करण्यासाठी ओटीपी नंबर सांगा, असे म्हणून एकाच्या बँक खात्यातून १ लाख ८ हजार ४७६ रुपये काढून घेतले. ही घटना १४ मे रोजी घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २६) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रूपेशकुमार श्रीबिरंचीप्रसाद बर्नवाल (वय ३६, रा. कृष्णानगर, इनकमटॅक्स कॉलनी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रूपेशकुमार यांना फोन आला. फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने आपण बँक कर्मचारी बोलत असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. तुमचे डेबिट कार्ड बंद झाले असून ते सुरू करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून येणारा ओटीपी नंबर सांगा, असे सांगितले. काही वेळाने रूपेशकुमार यांनी आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी आरोपीला सांगितला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ५ हजार ४७६ रुपये काढून घेतले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.