पदाच्या आमिषाने एक कोटीचा गंडा

By Admin | Updated: April 23, 2016 00:36 IST2016-04-23T00:36:55+5:302016-04-23T00:36:55+5:30

केंद्रीय युवा क्रीडा मंत्रालयाच्या महामंडळाचे मोठे पद देण्याच्या आमिषाने हिंजवडीतील प्रसिद्ध उद्योजकाला एक कोटीचा गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे

One lacs of one crore | पदाच्या आमिषाने एक कोटीचा गंडा

पदाच्या आमिषाने एक कोटीचा गंडा

वाकड : केंद्रीय युवा क्रीडा मंत्रालयाच्या महामंडळाचे मोठे पद देण्याच्या आमिषाने हिंजवडीतील प्रसिद्ध उद्योजकाला एक कोटीचा गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अमित तिवारी (वय ४५, रा. मुंबई) असे आरोपीचे नाव असून, किशोर शंकर गारवे (वय ५८, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत सहायक निरीक्षक महेंद्र कदम म्हणाले, ‘‘आरोपीने गारवे यांचा विश्वास संपादन करून केंद्रीय युवा क्रीडा मंत्रालयातील नेहरू युवा केंद्र संघटन नवी दिल्ली या महामंडळाचे डायरेक्टर जनरलचे पद देण्याचे आश्वासन दिले. त्या बदल्यात दीड कोटी देण्याची मागणी केली. आरोपीचा फोनही बंद झाल्याने फिर्यादीने हिंजवडी ठाण्यात तक्रार दिली.’’ (वार्ताहर)

Web Title: One lacs of one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.