शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाची नॅनो मोटारीला धडक बसल्याने एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:48 IST

भेळ चौकात अपघात : अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : भेळ चौक, निगडी प्राधिकरण येथे नॅनो मोटारीला भरधाव रिक्षाची धडक बसल्याने नॅनो मोटार दुभाजकाला धडकली. नॅनोतील एकाला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कालिदास काळोखे (वय ६३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक शंकर काळोखे (वय ६०, रा. प्राधिकरण) यांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. भेळ चौक, निगडी येथून जात असताना, विनायक काळोखे यांच्या ताब्यातील नॅनो मोटारीला रिक्षाचालकाने धडक दिली. या अपघातात नॅनो रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. अपघातात काळोखे यांचे बंधू कालिदास यांच्या छातीला जबर मार लागला. ते बेशुद्ध पडले. त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी न थांबता, पोलिसांना माहिती न देता रिक्षाचालक तेथून पळून गेला. काळोखे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची २० लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा४पिंपरी : चिखलीतील पंचवटी डेव्हलपर्सचे बनावट कागदपत्रे, शिक्के तयार करून खोट्या सह्या करून सेंट्रल बँक आॅफ इंडियातून २० लाख २० हजार रुपये कर्ज घेतले. या कर्जरकमेचा परस्पर अपहार केला. तसेच अन्य वित्त संस्थांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात चिखली पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.४पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल शंकरराव लोणकर, सचिन विठ्ठल लोणकर या दोन आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोधन अशोक वाघ (वय २८, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी आरोपीविरोधात चिखली पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली. इमारतीतील सहा खातेदारांना फसवून अ‍ॅक्सिस बँक, मुंबई, एचडीएफसी, महाराष्टÑ बँक, पिंपरी फायनान्स या वित्त संस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.दिघीत चोरी४पिंपरी : आझादनगर येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री दूरचित्रवाणी संच, मोबाइल, हेडफोन असा एकूण एक लाख १७ हजारांचा माल चोरून नेला आहे. छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिघी पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितेश पोपट शिवले यांनी फिर्याद दिली आहे. चºहोलीतील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे.मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार ठार४पिंपरी : रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून दुचाकीस्वारास देहूरोड येथे धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हरीष यशवंत शेलार (वय ५३, रा. दापोडी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.४पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली हरीश शेलार (वय २७) यांनी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत चालविले. त्यामुळे अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देताच मोटारचालक पळून गेला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात