रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू
By Admin | Updated: July 17, 2017 04:01 IST2017-07-17T04:01:29+5:302017-07-17T04:01:29+5:30
लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या लोणावळा-पुणे लोकलच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास आकुर्डीजवळ घडली.

रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या लोणावळा-पुणे लोकलच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास आकुर्डीजवळ घडली.
लोणावळा-पुणे ही लोकल पुण्याकडे जात असताना आकुर्डीच्या परमार पार्कजवळ हा अपघात झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसमाचे वय अंदाजे ३३ वर्षे, उंची पाच फूट पाच इंच आहे. रंगाने गोरा, नाक सरळ, अंगाने
मजबूत असे त्याचे वर्णन आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली असून, रेल्वे पोलीस तपास करीत आहेत.