अत्रे रंगमंदिरासाठी एक कोटीचा खर्च

By Admin | Updated: July 17, 2017 04:10 IST2017-07-17T04:10:16+5:302017-07-17T04:10:16+5:30

संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या आचार्य अत्रे प्रेक्षागृहातील वातानुकूलन यंत्रणेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.

One crore expenditure for Atre Rangamandir | अत्रे रंगमंदिरासाठी एक कोटीचा खर्च

अत्रे रंगमंदिरासाठी एक कोटीचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या आचार्य अत्रे प्रेक्षागृहातील वातानुकूलन यंत्रणेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी १२ लाख रुपये खर्च होणार आहे.
स्थायी समितीच्या सभेत या विषयाला मंजुरी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह उभारण्यात आले. या प्रेक्षागृहाला नाट्यसंस्था आणि रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून महापालिकेतर्फे संत तुकारामनगर येथे आचार्य अत्रे प्रेक्षागृह उभारण्यात आले. या प्रेक्षागृहाची सुमारे ८०० आसनांची क्षमता आहे. सुरुवातीला काही दिवस या प्रेक्षागृहात नाटकांचे प्रयोग झाले.

Web Title: One crore expenditure for Atre Rangamandir