पिस्तुलासह एकाला अटक
By Admin | Updated: March 22, 2017 03:12 IST2017-03-22T03:12:15+5:302017-03-22T03:12:15+5:30
मुंबई-बंगळूर महामार्गालगत वाकड येथील सयाजी हॉटेल पाठीमागे दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणाकडून विक्रीसाठी

पिस्तुलासह एकाला अटक
वाकड : मुंबई-बंगळूर महामार्गालगत वाकड येथील सयाजी हॉटेल पाठीमागे दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणाकडून विक्रीसाठी आणलेले एक पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सोमवार (दि.२०) सायंकाळी चारच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी दत्तात्रय बबन शिंदे (वय ३०, रा.दुर्गा कॉलनी, थेरगाव) मनोज पुनमचंद साळवे (वय २६, रा.अहमदनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिलेली माहिती अशी पोलीस नाईक सचिन सोनपेटे, भैरोबा यादव यांना वाकड येथील सयाजी हॉटेलच्या मागे मोकळ्या मैदानात दोन तरुण दारू पित बसले असून त्यापैकी दत्तात्रय शिंदे याच्या कमरेला विक्रीसाठी आणलेले पिस्तूल असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी छापा मारून त्यांच्याकडून पिस्तूल व ५ जिवंत काडतुसे असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. (वार्ताहर)