शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: सात वर्षाच्या मुलीचा गळा आवळून वडीलांनी आत्महत्या केल्याप्रकरणी एकाला अटक

By प्रकाश गायकर | Updated: March 20, 2024 18:16 IST

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे....

पिंपरी : सात वर्षाच्या मुलीचा खून करून वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. १९) पहाटे गुरुनानक नगर, थेरगाव येथे उघडकीस आला. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे.

सुनील कुवटे उर्फ रामराव कुयटे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भाऊसाहेब भानुदास बेदरे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती भाऊसाहेब आणि आरोपी सुनील यांच्यात जागेचा व्यवहार झाला होता. जागा विक्री केल्यानंतर त्याचे पैसे सुनील याने भाऊसाहेब यांना दिले नव्हते. त्या कारणावरून भाऊसाहेब यांनी मंगळवारी पहाटे त्यांच्या सात वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. 

फिर्यादी यांचे नातेवाईक मयत झाल्याने त्या रविवारी (दि. १७) मूळ गावी गेवराई, बीड येथे गेल्या होत्या. दरम्यान, त्यांचा १५ वर्षीय मुलगा, ७ वर्षीय मुलगी आणि पती भाऊसाहेब घरी होते. त्या मंगळवारी पहाटे पाच वाजता गावाहून घरी आल्या असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाऊसाहेब यांनी स्वंयपाक घरातील पंख्याला गळफास घेतला होता. तर मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. भाऊसाहेब यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. त्यामध्ये जागेच्या व्यवहारातील पैसे सुनील उर्फ रामराव याने दिले नसल्याने आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे