शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जुना पुणे-मुबंई महामार्ग : वाहतूककोंडी नित्याचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:53 IST

पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्गावर उड्डाणपुलाचे, तसेच एक किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देहूरोड : पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथील लोहमार्गावर उड्डाणपुलाचे, तसेच एक किलोमीटर लांबीच्या एलिव्हेटेड रस्त्याचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही या रस्त्यावरून जड, अवजड वाहनांची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरूअसल्याने तसेच बेशिस्त वाहनचालक रस्त्यावर व रस्त्यालगत चारचाकी व दुचाकी वाहने उभी करीत असल्याने नियमित वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र दिसत आहे.वारंवार होत असलेल्या वाहतूककोंडीने स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून, काम सुरू असल्याने अरुंद रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे .पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. ही वाहतूक कात्रज बाह्यवळण मार्ग, भूमकर चौक, वाकडमार्गे बिर्ला हॉस्पिटल, स्पाईन रोडमार्गे भक्ती शक्ती चौकाकडून वळविण्यात आल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी राजेश मुठे यांनी दिलेआहेत. मात्र या रस्त्यावरून जड, तसेच अवजड मालाची वाहतूक करणारी वाहने ये-जा करीत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. ठेकेदाराने देहूरोड व निगडी येथे मुख्य रस्त्यावर अडथळे उभारून जड वाहनांना प्रवेश बंद असल्याचे फलकही लावले आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ठेकेदाराने सुरुवातीला नेमलेले कामगार काढून घेतल्याने वाहनांना मोकळे रान मिळाले आहे. बंदी असलेल्या रस्त्यावरून सर्व वाहने ये-जा करताना दिसत आहेत. जड वाहतूक सुरू असल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यास जड वाहतूक बंद होऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे.वाहतुकीला अडथळा : रस्त्याकडेलाच पार्किंगदेहूरोड ते निगडी दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने देहूरोड येथे जुन्या बँक आॅफ इंडिया मुख्य चौकात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने दिवसभर दोन वॉर्डन नेमण्यात आलेले आहेत. चौकातील वाहतूककोंडी कमी झाली असली, तरी देहूरोड परिसरात रस्त्यावरून जड वाहतूक बंदी आदेश झुगारून वाहतूक होत असल्याने अरुंद महामार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच विविध कामे सुरू असल्याने जड वाहनांमुळे परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अनेकदा वाहतूककोंडी होत आहे. त्यातच काही मोटारचालक, दुचाकीस्वार रस्त्यावर, तसेच रस्त्याकडेला वाहन उभे करीत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड