शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अबब ! पिंपरीत झेंडू ६०० रुपये किलो ; किरकोळ विक्रेत्यांनी साधला दसऱ्याचा ‘मुहूर्त’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 10:15 PM

सकाळी नऊपर्यंतच बहुतांश विक्रेत्यांकडील झेंडू संपल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दर वाढवून प्रतिकिलो ६०० रुपयांपर्यंत नेला .

ठळक मुद्देचढ्या दराने विक्री : दसऱ्याला केवळ सहा टन आवक

पिंपरी : खंडे नवमीनिमित्त शनिवारी पिंपरी येथील फूल बाजारात ४० टन झेंडूची आवक झाली होती. मात्र दसऱ्याच्या दिवशी अर्थात रविवारी केवळ सहा टन आवक झाली. ठोक बाजारात २०० रुपये प्रतिकिलो असलेला झेंडूचार दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६०० रुपयांवर गेला. आवक कमी झाल्याने किरकोळ विक्रेत्यांनी चढ्या दराने विक्री केली.

पिंपरी येथील फूल बाजारात रविवारी खेड तालुक्यातील शिक्रापूर परिसर, चौफुला तसेच अहमदनगर येथून झेंडूची आवक झाली होती. मात्र ही आवक खूप कमी होती. त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवर झाला. सकाळी नऊपर्यंत बहुतांश विक्रेत्यांकडील झेंडू संपला होता. त्यानंतर काही किरकोळ विक्रेत्यांनी दर वाढवून प्रतिकिलो ६०० रुपयांपर्यंत नेले होते.

दसऱ्याच्या दिवशी किरकोळ तसेच घरगुती ग्राहकांकडून झेंडूची खरेदी केली जाते. किरकोळ विक्रेते, व्यावसायिक तसेच घराला सजावट करण्यासाठी ही खरेदी होते. असे असले तरी ही ग्राहकसंख्या मोठी असते. त्यामुळे फुलांना मोठी मागणी असते. मात्र प्रतिकिलो ६०० रुपये दर देऊनही अनेक ग्राहकांना झेंडू मिळाला नाही. काहींनी कमी खरेदी केली.      -------------+-----------खंडेनवमीलाच झाली मोठी खरेदीउद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील विविध कंपन्या व लघूउद्योगांतर्फे खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन करण्यात आले. शस्त्रपूजनानिमित्त झेंडुच्या फुलांची मोठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे अष्टमी व खंडेनवमीलाच त्यांच्याकडून फुलांची मोठी खरेदी करण्यात आली होती.-------------------+-------------वाहनांचे पुष्पहार आकुंचलेघरोघरी फुलांची सजावट करण्यात येते. तसेच दस-यानिमित्त वाहनांनाही झेंडूंचेही आकर्षक पुष्पहार लावण्यात येतात. मात्र यंदा झेंडू चढ्या दराने विक्री होत असल्याने या पुष्पहारांचा आकार लहान झाला होता. तर झेंडू उपलब्ध न झाल्याने काही जणांना वाहनांना पुष्पहाराची सजावट करता आली नाही.  ---------------+-----------खंडेनवमीला झेंडूची समाधानकारक आवक झाली. त्याचप्रमाणे अपेक्षित असतानाही रविवारी आवक झाली नाही. त्यामुळे काही किरकोळ विक्रेत्यांकडून झेंडूची चढ्या दराने विक्री झाली.  

- राजकुमार मोरे, अध्यक्ष, आडते संघ, पिंपरी-चिंचवड फुलबाजार----------++----फुलांचा दरशेवंती - २०० (प्रति किलो)गुलछडी - २०० (प्रति किलो)अष्टर – ३० ते ४० (चार गुच्छ)जरबेरा - ५० (१० फुलांचा गुच्छ)डच गुलाब – १०० ते १५० (२० फुलांचा गुच्छ)साधा गुलाब – २० (१० फुलांचा गुच्छ)--------+------------झेंडूचा दर (प्रतिकिलो)साधे गोंडे - १५० ते १६०कलकत्ता – १७० ते २००

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDasaraदसराbusinessव्यवसाय