शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
2
त्याची मला रुखरुख लागेलच... राज ठाकरेंचे मनसैनिकांना खुले पत्र; आणखी काय म्हणाले?
3
पाकिस्तानी पत्रकारांनी शाहबाज सरकारला दाखवली जागा, भर पत्रकार परिषदेत केला अर्थमंत्र्यांचा अपमान!
4
बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टी वधारले, इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' शेअर्सनी मारली बाजी
5
४४० व्होल्टचा झटका! ना पोल, ना कनेक्शन... ८२ हजारांचं पाठवलं वीज बिल, काय आहे हे प्रकरण?
6
अमेरिकेची डबल खेळी! ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तान सोपवणार 'खजिना'?; भारतासोबत चीनचीही झोप उडणार
7
'आभाळमाया'तील चिंगी आता दिसते अशी, लग्नात घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे सगळीकडून झालेलं कौतुक
8
अरे बापरे...! MBBS झालेल्यांचे हाल पहा, 60 मेडिकल कॉलेजमध्ये फुकटात काम करून घेतायत, इतर ठिकाणी ५०००...
9
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
10
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
11
भारतात श्रीमंतांचा आकडा वाढला! 'या' देशांना टाकले मागे, तुम्हीही यादीत आहात का?
12
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा
13
करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS
14
आधी कामाख्या देवीचं दर्शन, मगच...; सोनम रघुवंशीने राजासमोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज
15
हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या
16
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड
18
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटावरून सोनमला सुचला राजाच्या हत्येचा कट; भाऊ सचिन रघुवंशीचा मोठा दावा
19
प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!
20
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण

अरे बापरे ! तब्बल ८० कोटी रुपयांचे वीजबिल आकारून महावितरणने दिला शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 18:52 IST

लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योजकांना कंपन्या सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच विविध कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत असतो. लॉकडाऊननंतर उद्योग सुरू केल्यावर देखील महावितरणचा कारभार सुधारत असल्याचे दिसून येत नाही.

पिंपरी : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे उद्योजकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. भोसरी येथील एका लघुउद्योगाचे एका महिन्याचे वीजबिल ८० कोटी आकारण्यात आले होते. मात्र चूक लक्षात आल्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी दुरुस्ती करून देत ८४ हजार ९५० रुपये आकारल्याचे वीजबिल संबंधित उद्योजकाला दिले.लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या उद्योजकांना कंपन्या सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यातच विविध कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत असतो. लॉकडाऊननंतर उद्योग सुरू केल्यावर देखील महावितरणचा कारभार सुधारत असल्याचे दिसून येत नाही. वीजपुरवठा खंडीत झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक महावितरण कंपनीच्या संबंधित शाखा कार्यालयात फोन करतात. मात्र त्याला प्रतिसाद दिला जात नाही, अशी तक्रार उद्योजकांकडून होत आहेत. पिंपरी - चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सभासद बाबू जॉन यांचा प्लास्टिक मोल्ड तसेच इंजिनियरिंगशी संबंधित लघुउद्योग आहे. भोसरी येथे प्राधिकरण हद्दीत पेठ क्रमांक दहामध्ये साई प्रोफाइल नावाने जॉन यांची कंपनी आहे. या कंपनीचे दरमहा एक ते दीड लाख रुपयांपर्यंत वीजबिल येते. महावितरणने मे महिन्यासाठी ८० कोटी रुपये वीजबिल आकारले. लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग ठप्प झाले. लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. त्यामुळे उद्योग अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. त्यात लघुउद्योग सुरू करण्यात मोठ्या अडचणी आहेत. पुरेसे काम नसल्याने वीजवापर कमी होत आहे.पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संदीप बेलसरे याबाबत म्हणाले, संबंधित वीजबिलाबाबत महावितरणच्या शाखा अभियंत्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर वीजबिलात दुरुस्ती करून देण्यात आली. त्यानुसार ८४ हजार ९५० रुपये सुधारित वीजबिल देण्यात आले आहे. वीजवापर कमी होत असतानाही महावितरणच्या संबंधित विभागाला याचे भान असल्याचे दिसून येत नाही. महावितरणने प्रत्यक्ष वीज मीटरचे रीडिंग घेऊन बिल दिले पाहिजे. त्यामुळे अश्या चुका होणार नाहीत.लघुउद्योजक बाबू जॉन म्हणाले, ‘‘दरमहिन्याला एक ते दीड लाख रुपयांपर्यंत वीजबिल येते. मे महिन्याचे वीजबिल मला रविवारी मिळाले. ते ८० कोटींपर्यंत होते. ते बिल पाहून मी हबकलो. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मोठा मनस्ताप झाला.’’  

तांत्रिक कारणांमुळे विजबिलावर चुकीची रक्कम नमूद झाली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर लागलीच त्यात सुधारणा करण्यात आली. संबंधित ग्राहकास दुरुस्ती केलेले विजबिल देण्यात आले आहे.- राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी शाखा

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजPuneपुणे