करसंकलन कार्यालयाची दुरवस्था
By Admin | Updated: January 28, 2017 00:18 IST2017-01-28T00:18:08+5:302017-01-28T00:18:08+5:30
यमुनानगर येथे नागारिकांच्या सोयीसाठी तळवडे करसंकलन विभागीय कार्यालय सुरु करण्यात आले. हे कार्यालय फार जुने असल्यामुळे

करसंकलन कार्यालयाची दुरवस्था
निगडी: यमुनानगर येथे नागारिकांच्या सोयीसाठी तळवडे करसंकलन विभागीय कार्यालय सुरु करण्यात आले. हे कार्यालय फार जुने असल्यामुळे कार्यालयाची दुरवस्था झाली आहे.
या इमारतीच्या भिंती रंगहीन झाल्या आहेत, तर काही भिंतीना बाहेरून भेगा पडल्या आहेत. काही खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे या कार्यालयाच्या सुशोभीकरणास बाधा पोहचत आहे. येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्यासाठी स्वतंत्र अशी पार्किंग सुविधा आहे. परंतु या पार्किंगमधील फरशा ठिकठिकानी तुटल्याने पार्किंगची चाळण झाली आहे. यामुळे काही नागरिक व कर्मचारी इमारतीसमोरच वाहने लावत आहेत.
या इमारतीच्या छताची दुरवस्था झाल्याने हे छत ठिकठिकाणी मोडले आहे. यामुळे या इमारतीचे विद्रूपीकरण झाले आहे.
पावसाळ्यात छतामधून पाणी झिरपून रेकॉर्ड रूममधील करधारकांचे जतन केलेले महत्वाचे दस्त ऐवज पावसाळ्यात पाण्यामध्ये भिजू शकतात. मूळ नोंदी नष्ट होण्याचा धोका नाकारता येणार नाही.(वार्ताहर)