माननीयांच्या नातेवाइकांवर गुन्हा

By Admin | Updated: March 31, 2017 02:55 IST2017-03-31T02:55:33+5:302017-03-31T02:55:33+5:30

पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामाचा फोटो काढून पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला

Offense of Honor's relatives | माननीयांच्या नातेवाइकांवर गुन्हा

माननीयांच्या नातेवाइकांवर गुन्हा

पिंपरी : पिंपळे गुरवमध्ये अनधिकृत बांधकामाचा फोटो काढून पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला बीट निरिक्षकाला अटकाव करण्यात आला. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर सांगवी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरसिंग आदियाल असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित महिला बीट निरीक्षक यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महापालिकेमार्फत शहरातील अनधिकृत बांधकामांचे फोटो काढून त्यांचा पंचनामा केला जातो. त्यानंतर संबंधित बांधकामाच्या मालकाला ते काढून टाकण्याची कायद्यानुसार नोटीस बजावली जाते. पिंपळे गुरवमधील सुदर्शननगरमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचापंचनामा करण्यासाठी महापालिकेच्या बीट निरीक्षक असलेल्या एक महिला कर्मचारी गुरुवारी त्या ठिकाणी गेल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Offense of Honor's relatives