आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:51 IST2017-08-04T02:51:28+5:302017-08-04T02:51:28+5:30
पतीकडून सतत होणा-या छळाला कंटाळून सुनीता सतीश वाघ (वय २९) या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली आहे.

आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात गुन्हा
पिंपरी : पतीकडून सतत होणा-या छळाला कंटाळून सुनीता सतीश वाघ (वय २९) या महिलेने विष पिऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २३ जुलैला घडली असून, बुधवारी (दि. २) याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश भगवान वाघ (वय ४३, रा. आनंदवन सोसायटी, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे.
दोन्ही मुली झाल्या म्हणून पती सतीश सुनीताला वारंवार मारहाण व शिवीगाळ करीत असे. हा मानसिक व शारिरीक छळ असह्य झाल्याने सुनीताने २३ जुलैला राहत्या घरी रात्री नऊला विषारी औषध पिले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा २६ जुलैला मृत्यू झाला. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सतीशविरोधात दाखल केला आहे. सुनीताची आई शकुंतला जाधव यांनी फिर्याद दिली.