अवकाळीने शेतपिकांचे नुकसान
By Admin | Updated: December 15, 2014 04:56 IST2014-12-15T02:15:11+5:302014-12-15T04:56:02+5:30
अचानक बदलेल्या वातावरणामुळे बागायती पट्ट्यातील फळबागा रोगांना बळी पडतच आहेत. केळीच्या बागांवर करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर

अवकाळीने शेतपिकांचे नुकसान
अचानक बदलेल्या वातावरणामुळे बागायती पट्ट्यातील फळबागा रोगांना बळी पडतच आहेत. केळीच्या बागांवर करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर द्राक्ष आणि डाळिंब बागा, तसेच कोंथिबीर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या ऊस कारखान्याचा हंगाम जोरात सुरू आहे.
माळेगाव परिसरात ऊस पट्ट्यात झालेल्या पावसामुळे ऊसतोडी मंदावणार आहेत. तर, काही भागांत रस्ते चिखलमय झाल्याने ऊसतोडी दोन ते तीन दिवस थांबणार आहेत.
(वार्ताहर)