उपजिल्हा रूग्णालयातील जखमींची संख्या ६ वर
By Admin | Updated: August 2, 2014 04:21 IST2014-08-02T04:21:30+5:302014-08-02T04:21:30+5:30
माळीण येथील दुर्घटनेत बचावलेल्या विठ्ठल पांडुरंग तिटकारे (वय २५)या तरूणाला आज दुपारी उपचारांसाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले

उपजिल्हा रूग्णालयातील जखमींची संख्या ६ वर
मंचर : माळीण येथील दुर्घटनेत बचावलेल्या विठ्ठल पांडुरंग तिटकारे (वय २५)या तरूणाला आज दुपारी उपचारांसाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. त्याच्या पायाला फ्रॅ क्चर झाले असून शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या रूग्णालयातील जखमींची संख्या आता ६ झाली आहे.
तिटकारे यास प्रारंभी अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी ठेवण्यात आले होते, रात्री घरी सोडण्यात आले. गुरूवारी छातीत दुखू लागल्याने त्यास मंचर रूग्णालयात दाखल करण्यात आले.त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक सीमा देशमुख यांनी सांगितले.
उपचारांसाठी दाखल रूग्णांना मानसिक धक्का बसल्याने त्यांचे समुपदेशन सुरू असून आणखी ३ दिवस रूग्णालयात ठेवले जाणार आहे.
मनोहर लेंभे त्यांच्या पत्नी तानुबाई लेंभे, सून प्रमिला आणि नातू रूद्र तसेच मीना शिवाजी लेंभे यांच्यावर यापुर्वीच रूग्णालयात उपचार सुरू झाले आहेत.