शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

आता तळवडेला धास्ती; चिखली-कुदळवाडीच्या कारवाईनंतर नवा भाग रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:10 IST

ज्योतिबानगरचे लघुउद्योजक मानसिक तणावात

- रामहरी केदारचिखली : चिखलीच्या कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांवर आठवड्याभरात जोरदार कारवाई सुरू आहे. या परिसरात अनेक उद्योजक आस्थापनांच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगार देत होते; मात्र, महापालिका प्रशासनाने कारवाई केल्याचा परिणाम अनेकांच्या उपजीविकेवर झाला आहे. यानंतर आता चिखली परिसराला लागूनच असलेल्या तळवडेतील ज्योतिबानगर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनीही कारवाईची धास्ती घेतली आहे.

तळवडे परिसरातदेखील कारवाई होण्याच्या अफवा काही नागरिक पसरवत आहेत. या परिसरात कारवाई कधी व कोणत्या निकषाला अनुसरून होणार आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसताना पसरविलेल्या अफवा उद्योजकांसाठी तणावाचे कारण ठरत आहेत.

तळवडे परिसरातील नवीन पत्रा शेडना नोटिसा देण्याचे काम सुरू आहे. कारवाईसंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवरून होतो. परिसरात कुणीही अफवा पसरविण्याचे काम करू नये, महापालिका प्रशासनाकडून सर्वेक्षणानुसार कारवाई करण्यात येत आहे. - श्रीकांत कोळप, क्षेत्रीय अधिकारी, ‘फ’ प्रभाग तळवडे परिसरातील उद्योजकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अजूनपर्यंत तरी कुठल्या उद्योजकांना अनधिकृत बांधकामाची नोटीस आल्याची माहिती संघटनेकडे नाही. सर्व उद्योजकांच्या पाठीशी संघटना ठाम उभी आहे. - संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनालघुउद्योजकांनी या कारवाईविरोधात एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे. प्रशासनाकडून करण्यात येणारी कारवाई अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आहे. या कारवाईपूर्वी या उद्योजकांच्या पुनर्वसनाची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने मानवनिर्मित आपत्ती निर्माण केल्याने अनेकजण भयभीत झाले आहेत. - गोरख भोरे, उद्योजक, तळवडे

तळवडे परिसर आणि अर्थचक्रज्योतिबानगर, गणेशनगर, तळवडे गावठाण, बाठेवस्ती, त्रिवेणीनगर यासह एमआयडीसीचा माहिती-तंत्रज्ञान पार्क यांचा समावेश तळवडे औद्योगिक वसाहतीत होतो. या परिसरात फॅब्रिकेशन, प्रेसिंग, पेंटिंग, मशिनिंग यासह मोठ्या उद्योगांना लागणाऱ्या मालाचा पुरवठा करणारे शेकडो उद्योग आहेत. या उद्योगांचे अर्थचक्र मोठ्या आस्थापनांवर अवलंबून आहे.

तीन हजारांवर लघुउद्योग

तळवडे परिसरात अंदाजे तीन हजारांहून अधिक लघुउद्योग अस्तित्वात आहेत. या उद्योगांवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या परिसरात कारवाई झाली तर हजारो कुटुंबीय उघड्यावर येण्याची भीती आहे.

रेड झोन

तळवडेच्या हद्दीत पूर्वी संरक्षण खात्याने शिक्कामोर्तब केल्याने या परिसराला ‘रेड झोन’ घोषित केले आहे. संरक्षण खात्याअंतर्गत येणाऱ्या जमिनी गृहीत धरून तळवडेचा परिसर एक हजाराहून अधिक एकरवर असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. यामध्ये दोनशे एकरपेक्षा अधिक परिसरावर औद्योगिक आस्थापना असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

यांना मिळाल्या नोटिसा

तळवडे व चिखलीलगतच्या परिसरातील रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या बांधकामांना अनधिकृत असल्याच्या नोटिसा दिल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाcollectorजिल्हाधिकारी