उद्योगनगरीत आता पूर्ण होणार स्वत:च्या वास्तूचे स्वप्न

By Admin | Updated: February 21, 2016 03:03 IST2016-02-21T03:03:13+5:302016-02-21T03:03:13+5:30

मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात घर घेण्यास नागरिक पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये

Now the dream of own architecture will be completed in the industry | उद्योगनगरीत आता पूर्ण होणार स्वत:च्या वास्तूचे स्वप्न

उद्योगनगरीत आता पूर्ण होणार स्वत:च्या वास्तूचे स्वप्न

पिंपरी : मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात घर घेण्यास नागरिक पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये दि. २७ व २८ फेब्रुवारीला ‘लोकमत पीसीएमसी प्रॉपर्टी शोकेस २०१६’चे आयोजन केले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट्स, बंगलोज, प्लॉट्स आणि शॉप्सचे एकाच ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या प्रांगणात हे प्रदर्शन होत असून, उद्योगनगरीत ‘लोकमत’च्या वतीने प्रथमच प्रॉपर्टी शोकेसचे आयोजन केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडलगत चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, खेड, आंबेगाव, राजगुरुनगर अशा विविध परिसरात नामांकित बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्प साकारत आहेत. नियोजनबद्ध विकासामुळे या भागात घर घेण्यास मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक प्राधान्य देत आहेत.
अत्याधुनिक अ‍ॅमिनेटीजसह, बजेट होमसह लक्झ्युरियस असे ‘स्वप्नातलं घर’ साकारण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाचा असतो. स्वप्नातील घराला बळकटी देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच उपनगरातील परिसरात घर निवडण्याची संधी या वेळी उपलब्ध असणार आहे. शेकडो मान्यवर प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. प्रदर्शनाच्या एकाच ठिकाणी असंख्य आॅफर्स उपलब्ध असणार आहेत.
२७ व २८ फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. विनाशुल्क प्रवेश असणार आहे. या प्रॉपर्टी शोकेसध्येच आता नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. नागरिकांनी आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रॉपर्टी शोमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे टायटल स्पॉन्सर एलोरा-सिद्धी ग्रुप असून, पॉवर्ड बाय
स्पॉन्सर बिग इंडिया ग्रुप आहे. तसेच बेव्हरेज पार्टनर ऊर्जा ग्रुप आहे. या ठिकाणी नि:शुल्क प्रवेश आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now the dream of own architecture will be completed in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.