शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमधून अश्विनी जगतापांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी तर भोसरीतून महेश लांडगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 17:24 IST

विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर भाजपकडून शंकर जगताप की आमदार अश्विनी जगताप अशी चर्चा रंगली होती

पुणे : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटवनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला होता. आता मात्र भाजपनं अश्विनी जगतापांचा पत्ता कट केला असून त्यांचे दीर शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली. त्यामध्ये चिंचवडविधानसभा मतदार संघातून शंकर जगताप यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू शंकर जगताप हे तीव्र इच्छुक होते. मात्र, आमदारांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी या निवडणूक लढण्यावर ठाम होत्या. त्यामुळे शंकर जगताप यांनी एक पाऊल मागे घेत अश्विनी जगताप यांना संधी दिली. पोटनिवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली अश्विनी जगताप विरुद्ध महाविकास आघाडी कडून नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांनी अशी तिरंगी लढत झाली. मतविभाजनामध्ये जगताप यांचा विजय झाला. 

त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शहराध्यक्ष म्हणून शंकर जगताप यांना संधी दिली. त्यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांनी विरोध केला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली होती. त्यानंतर विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर भाजपकडून शंकर जगताप की विद्यमान आमदार अश्विनी जगताप अशी चर्चा होऊ लागली. त्यावेळी त्यावेळी शंकर जगताप की अश्विनी जगताप अशी चर्चा शहरात रंगली होती. तसेच दोघांमध्ये आमदारकीच्या मुद्द्यावरून समेट घडवण्याची चर्चाही होती. त्यानंतर शंकर जगताप चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये कामाला लागले होते. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात त्यांनी मतदार संवादावर भर दिला. दरम्यानच्या काळामध्ये आमदार अश्विनी जगताप यांनी उमेदवारी कोणालाही मिळो, भाजपाचे काम करणार? शंकर जगताप उमेदवार असले तरी काम करणार अशी ठाम भूमिका घेतली होती. तर भाजपतील एका गटाने शंकर जगताप यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. तसेच राजीनामा नाट्यही झाले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज करण्याच्या दोन दिवस अगोदर भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये शंकर जगताप यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

महेश लांडगेंना निवडणूक लढवण्याची संधी 

महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. चौरंगी लढतीमध्ये लांडगे विजयी झाले. त्यानंतर भाजप युती सरकारमध्ये भाजप  संलग्न आमदार लांडगे  होते. तसेच 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दुरंगी लढते महेश लांडगे दुसऱ्यांदा आमदार झाले. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड मधील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून केवळ लांडगे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर त्यांना विधानसभेच्या रणधुमाळीत उतरण्याची संधी भाजपनं दिली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Lakshman Jagtapलक्ष्मण जगतापchinchwad-acचिंचवडvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणBJPभाजपा