पिंपरी : कॅबमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला असताना, राज्य सरकारने रिक्षा परवाना खुला केला आहे. या निर्णयामुळे शहराच्या वाहतूककोंडीत भरच पडणार असून, या व्यवसायासमोरील अडचणीत आणखी वाढ होईल. त्यामुळे सरसकट सर्वांना परवाना न देता बेरोजगारांना तो देण्यात यावा, त्याबाबतचे निकष ठरवावे, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी येथे केली.रिक्षाचालकांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) निदर्शने करण्यात आली. रिक्षा परवाना अर्ज आॅनलाइन भरण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच बाहेर ही निदर्शने झाली.
रिक्षा परवानावाटप सरसकट नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:12 IST