शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

' पीएमपी' च्या ताफ्यातील मिडी बसला सोसेना प्रवाशांचा भार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 13:35 IST

‘पीएमपी’च्या ताफ्यामध्ये दोन वर्षांपुर्वी २०० मिडी बस दाखल...

ठळक मुद्देमिडी बसच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याने याबाबत संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार 'एआरएआय' करणार मिडी बस ची तपासणीबसच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित

पुणे : जेमतेम दोन वर्षांच्या कालावधीतच पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या ताफ्यातील मिडी बसला प्रवाशांचा भार सोसवेनासा झाला आहे. सुमारे २०० बसपैकी ५० हून अधिक बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. लांबपल्याच्या फेऱ्या तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्येमुळे या बस नादुरूस्त होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यामध्ये दोन वर्षांपुर्वी २०० मिडी बस दाखल झाल्या. या बस शहरांतर्गत छोट्या रस्त्यांवरील मार्गांवर सोडण्यात येतील, असे सुरूवातीला अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. पण त्यावेळी ताफ्यातील एकुण बसची संख्या अपुरी असल्याने या बस लांबपल्याच्या, गर्दीच्या मार्गावर सोडण्यास सुरूवात झाली. बसची आसन क्षमता केवळ ३२ एवढी आहे. पण अनेकदा या बसमधून ७० ते ७५ प्रवासी प्रवास करतात. पण काही महिन्यांतच बस मार्गातच बंद पडण्यास सुरूवात झाली. साधारणपणे दीड वर्षातच काही बसच्या इंजिनमध्ये बिघाड होऊ लागला. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी बसच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरूवात केली. अजूनही इंजिनमधील दोष सातत्याने पुढे येत आहेत. आतापर्यंत ३० ते ३५ बसचे इंजिन बदलण्यात आले आहे. सध्या २० ते २५ बसच्या इंजिनची कामे सुरू असल्याने त्या बंद आहेत. तसेच दररोज काही बसचे ब्रेकडाऊनही होत आहे. पिंपरी आगारात बुधवारी (दि. १२) मिडी बसच्या इंजिनमध्ये स्फोट होऊन तीन कर्मचारी जखमी झाले. यापुर्वी दोन-तीन वेळा अशा घटना घडल्याचे कर्मचारी सांगतात. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर वाहतुकीसाठी आवश्यक क्षमती मिडी बसमध्ये नाही. काही दिवसांतच ते समोर आले. बसच्या आसन क्षमतेपेक्षा दुपटीहून अधिक प्रवासी प्रवासी करत आहेत. काही बसला लांबपल्याचे मार्ग देण्यात आले. कात्रज आगारातून सासवडसाठी सोडण्यात येणाºया बस तीव्र चढाच्या बोपदेव घाटातून जातात. प्रवाशांनी भरून वाहणाऱ्या बसला हा तीव्र चढ चढणे अत्यंत जिकीरीचे आहे. यापुर्वी काही बस घाटातच बंद पडल्या आहेत. काही मार्ग बंद करण्याबाबत वाहतुक व्यवस्थापकांना सांगण्यातही आले आहे. बसमध्ये सातत्याने होत असलेले बिघाड चिंताजनक आहेत. कंपनीने बससाठी दोन वर्षांची वॉरंटी दिली होती. काही बसचा वॉरंटीचा कालावधी आता संपला आहे. त्यामुळे या बसच्या दुरूस्तीचे काम पीएमपीलाच करावे लागत आहे. तर वॉरंटीमध्ये असलेल्या बसचे इंजिन कंपनीकडून बदलून दिले जात आहे. ---------------'एआरएआय' करणार मिडी बस ची तपासणीमिडी बस मधील बिघाडाने त्रस्त झालेल्या पीएमपी प्रशासनाने ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) कडून बस ची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एक मिडी बस तातडीने संस्थेत पाठवली जाणार आहे. बसची सर्वप्रकारे तांत्रिक तपासणी केली जाईल. पीएमपी अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान, पिंपरी आगारात बुधवारी मिडी बस च्या इंजिनचा स्फोट झालेला नाही. अचानक इंजिन रेस झाल्याने गियर बॉक्सचे आवरण, क्लच प्लेट तुटली. त्याचा आवाज होऊन तुकडे तीन कर्मचाऱ्यांच्या अंगावर उडाले, असा खुलासा प्रशासनाने दिला आहे........कंपनीशी पत्रव्यवहारमिडी बसच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याने याबाबत संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सर्व तांत्रिक दोष कंपनीकडून दुरूस्त करून दिले जात आहेत. ही कंपनीची जबाबदारी आहेत. - अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे