देवमाणूस नको; मात्र माणूस म्हणून तरी समजून घ्या!
By Admin | Updated: March 25, 2017 03:48 IST2017-03-25T03:48:56+5:302017-03-25T03:48:56+5:30
डॉक्टरला आजही देवाचा दर्जा दिला जातो. मात्र अलीकडच्या काळात घटनेचे मूळ समजून न घेताच डॉक्टरांवर होणाऱ्या अमानुष हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

देवमाणूस नको; मात्र माणूस म्हणून तरी समजून घ्या!
वाकड : डॉक्टरला आजही देवाचा दर्जा दिला जातो. मात्र अलीकडच्या काळात घटनेचे मूळ समजून न घेताच डॉक्टरांवर होणाऱ्या अमानुष हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर फॅमिली फिजिशियन असोसिएशनने लोकमतच्या व्यासपीठावर संवाद साधून समस्यांचा जणू पाढाच वाचला. देव माणूस नको निदान एक माणूस म्हणून तरी आम्हाला योग्य वागणूक देत समजून घ्या, असे आवाहन डॉक्टर असोसिएशनने केले.
या वेळी असोसिएशनचे शहराध्यक्ष डॉ. धनराज हेळंबे, मुख्य सचिव डॉ. प्रशांत माने, डॉ. प्रवीण कोकाडे, आयोजक डॉ. संदीप जगताप, सचिव डॉ. मंगल ठुबे, डॉ शरद गव्हाणे, डॉ रवींद्र द्विवेदी, डॉ. अजित पाटील, डॉ. अंजली दूधगावकर, डॉ. विजय शिर्के, डॉ. सुनील उगीले, डॉ. क्रिष्णा तिवारी, प्रवक्त्या डॉ. मनीषा दणाणे, डॉ. रश्मी काळे, डॉ. पद्मनाथ केसकर, डॉ. मनीषा पाटील, अपर्णा दत्तवाडे, विजय शिर्के या वेळी उपस्थित होते.
डॉक्टरवर वारंवार हल्ले होत आहेत. ही समस्या एकट्या खासगी किंवा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची नाही, तर किरकोळ
नर्सिंग होम आणि क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांनादेखील हीच समस्या भेडसावत असल्याने सेवा द्यायची कशी, असा पेच निर्माण झाला आहे. (वार्ताहर)