‘राष्ट्रवादीला सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत’

By Admin | Updated: August 3, 2014 01:23 IST2014-08-03T01:23:21+5:302014-08-03T01:23:21+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागले आहे,

'No fault was found when NCP was in power' | ‘राष्ट्रवादीला सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत’

‘राष्ट्रवादीला सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत’

पुणो : राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच त्रिपाठी यांचे वक्तव्य हे केवळ संधीसाधूपणा असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. एका कार्यक्रमानिमित्ताने चव्हाण हे पुण्यात आले होते. त्यामुळे आघाडीत जागा वाटपावरून बिघाडी झाली असताना नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात
 निम्म्या जागा मिळाव्यात, अशी मागणी करीत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची 
ताकद वाढली असून, काँग्रेसला शहाणपण यावे, असे वक्तव्य त्रिपाठी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत केले होते. तसेच काँग्रेसला आघाडी चालविण्याची बुद्धी नसल्याची टीकाही त्यांनी केली होती. या वक्तव्याचा मुख्यमंत्री चव्हाण यांनी शनिवारी खरपूस समाचार घेतला.  महाराष्ट्रातील व देशातील जनता सुज्ञ असून ती प्रत्येकाला ओळखते, असे ते म्हणाल़े (प्रतिनिधी)

 

Web Title: 'No fault was found when NCP was in power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.