विकासाचे पर्व सुरु ठेवणार : नितीन मराठे

By Admin | Updated: February 16, 2017 03:06 IST2017-02-16T03:06:28+5:302017-02-16T03:06:28+5:30

जिल्हा परिषद इंदोरी सोमाटणे गटातील विकासाचे पर्व पुढे सुरु ठेवण्यासाठी या गटातील मतदार भाजपाच्या मागे ठामपणे उभे राहतील,

Nitin Marathe will continue the development phase: | विकासाचे पर्व सुरु ठेवणार : नितीन मराठे

विकासाचे पर्व सुरु ठेवणार : नितीन मराठे

उर्से : जिल्हा परिषद इंदोरी सोमाटणे गटातील विकासाचे पर्व पुढे सुरु ठेवण्यासाठी या गटातील मतदार भाजपाच्या मागे ठामपणे उभे राहतील, असा विश्वास गटातील भाजपाचे उमेदवार नितीन मराठे यांनी आढे,ओझर्डे व उर्से येथील गावातील भेटी दरम्यान व्यक्त केला.
गटातील परिसराचा मागील पाच वर्षांमध्ये ज्याप्रमाणे विकास केला गेला, त्याचप्रमाणे नव्याने विकास करायचा आहे. येथील सर्व विकासकामे तुमच्याच सहकार्याने भाजपाने केली असल्याने यापुढेही विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मराठे यांनी आढे,ओझर्डे व उर्सेतील शेतकऱ्यांशी घरोघरी भेटी घेवुन संवाद साधला. महिला तरुण व वयोवृध्द यांच्याशी हितगुज केले. भाजपाने केलेला विकास व चालू असलेली कामे याबाबतचा आढावा ग्रामस्थांना देण्यात आला.
सध्या आढे ओझर्डे उर्से रस्त्याचे काम सुरु असुन लवकरच काम पुर्ण होणार आहे. त्यामुळे येणारा पुढील पाच वर्षाचा काळ हा विकासकामे करण्यासाठीच आहे. या गटातील
सर्व गावातील नागरीकांना पायाभुत सुविधा सक्षमपणे उपलब्ध
करुन देण्यासाठी कटीबध्द राहून आणखी विकासकामात भर घालणार आहे. ही सर्व विकासकामे तुमच्या सहकार्यानेच करु असे आश्वासन मराठे यांनी प्रचारादरम्यान
दिले. (वार्ताहर)

Web Title: Nitin Marathe will continue the development phase: