शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Pune Crime | बिल्डरकडे नऊ कोटींच्या खंडणीची मागणी; धमकावणारा ठग जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 21:00 IST

डांगे चौक येथे सापळा रचून केली कारवाई...

पिंपरी : बांधकाम व्यावसायिकाकडे नऊ कोटींची खंडणी मागून त्यातील दोन कोटींचा धनादेश स्वीकारताना पोलिसांनी एका ठगाच्या मुसक्या आवळल्या. बांधकाम व्यावसायिकांना तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांना धमकावल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. खंडणी आणि गुंडा विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. २७) डांगे चौक येथे सापळा रचून ही कारवाई केली. 

आदिनाथ बी. कुचनुर (रा. डांगे चौक) असे अटक करण्यात केलेल्याचे नाव आहे. केतूल भागचंद सोनिगरा (वय ४१, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डांगे चौक येथे सिग्नेचर पार्क नावाने बांधकाम साईट सुरू आहे. दरम्यान, आरोपीने त्यांना फोन करून बांधकामात खूप त्रुटी असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या विरोधात नॅशनल ग्रीन ट्रिबुनलकडे खोटे अहवाल सादर करून अडचणीत आणण्याची धमकी दिली. त्यासाठी त्यांच्याकडे सव्वानऊ कोटींची खंडणी मागितली. 

दरम्यान, फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार, खंडणी व गुंडा विरोधी पथकाने फिर्यादीच्या ऑफिसमध्ये साध्या वेशात सापळा रचून आरोपीला खंडणीची रक्कम नेण्यास बोलविले. त्यावेळी फिर्यादीने ठरलेल्या रकमेपैकी दोन कोटींचा धनादेश आरोपीला दिला. आरोपीने धनादेश हातात घेताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. आरोपीला शनिवारी (दि. २८) मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, डाॅ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, सहायक निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, किरण काटकर, शाम बाबा, विजय तेलेवार, आशिष बोटके, तौसिफ शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन निवृत्त न्यायाधीशांची कागदपत्रे बनविणे, बांधकाम व्यवसायिकांना ब्लॅकमेल करणे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून त्यांना वेठीस धरणे, वास्तुविशारदांची बदनामी करणे, अशा आरोपांखाली हिंजवडी, पिंपरी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने दोन वर्ष कारावासही भोगला आहे. कोणीही खंडणीची मागणी करीत असल्यास न घाबरता नागरिकांनी तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड