शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

‘तिच्या’ मदतीसाठी स्वयंसेवी संस्थेची धाव; पतीने झिडकारलेली महिला सावरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:24 PM

अगोदरच संकटात सापडलेली महिला आणखी संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबी वेल्फेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत कार्यालयास भेट देऊन महिलेची माहिती घेतली. तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

ठळक मुद्देमुलींच्या जन्माने संकटात सापडलेली माता जुळ्यापैकी एक बाळ दगावल्याने आणखी विवंचनेतआर्थिक जुळवाजुळव करीत दुसऱ्या बाळाला जगविण्याचा तिचा प्रयत्न

पिंपरी : जुळ्या मुलींना जन्म दिल्याने पतीने झिडकारले. ९ महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच प्रसूती झाल्याने दोन्ही बाळांची प्रकृती गंभीर होती. खचार्ची कशीबशी तोंडमिळवणी करीत असताना, सोमवारी दहाव्या दिवशी एक बाळ दगावले. दुसऱ्याला बाळाला वाचविण्याची तिची धडपड सुरू आहे. अगोदरच संकटात सापडलेली महिला आणखी संकटाच्या गर्तेत अडकू लागली असताना, पंजाबी वेल्फेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत कार्यालयास भेट देऊन महिलेची माहिती घेतली. तिला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.विवाहानंतर पहिल्याच प्रसूतीसाठी पत्नीला माहेरी सोडले. प्रसूती झाली. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला, मुली नकोशा आहेत, म्हणून ‘तू आणि तुझ्या मुली, माझा यापुढे तुझ्याशी काही संबंध राहणार नाही, असे सांगून विवाहाची वर्षपूर्ती होण्याआगोदरच पत्नीला एकाकी सोडून पती पंजाबमध्येच थांबला. पत्नीला आधार, धीर देण्याऐवजी जुळ्या मुलींना जन्म दिला याबद्दल दोषी ठरवून तिला एकाकी सोडणाऱ्या पाषाणहृदयी पतीने प्रसूतीनंतर पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्याचीही तसदी घेतली नाही. मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली माता जुळ्यापैकी एक बाळ दगावल्याने आणखी विवंचनेत पडली आहे. परिस्थितीला धैर्याने एकाकी झुंज देणाऱ्या या महिलेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. एकीकडे पतीची साथ नाही, दुसरीकडे आर्थिक जुळवाजुळव करीत दुसऱ्या बाळाला जगविण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भातील लोकमतची बातमी वाचून पंजाबी वेल्फेअर असोशिएशनचे सेक्रेटरी हरेश मन्ना यांनी लोकमत पिंपरी कार्यालयात येऊन प्रतिनिधीची भेट घेतली. या महिलेसंबंधी तसेच तिच्या कुटुंबाविषयी माहिती घेऊन तिला मदत करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे, असे सांगितले. संस्थेचे संस्थापक सुरेंद्र वाधवा व अन्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही या महिलेला तातडीने मदत करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या. मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली महिला धैर्याने परिस्थितीवर मात करीत असताना तिला येणाऱ्या अडचणींबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. त्यामुळे संस्थेला माहिती मिळू शकली. त्यामुळे संस्थेचे सेक्रेटरी हरेश मन्ना यांनी लोकमतचे आभार मानले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड