शिष्यवृत्ती परीक्षा नवीन अभ्यासक्रमावर
By Admin | Updated: August 21, 2014 23:42 IST2014-08-21T23:42:55+5:302014-08-21T23:42:55+5:30
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012) नवीन अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार

शिष्यवृत्ती परीक्षा नवीन अभ्यासक्रमावर
पुणो: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मार्च 2015 मध्ये घेतली जाणारी इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012) नवीन अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेतचे आयुक्त व्ही.बी.पायमल यांनी कळविले आहे.
परीक्षा परिषदेने नवीन अभ्यासक्रमावर आधारित विषय योजना व घटकनिहाय गुण विभागणीचा कच्चा आराखडा तयार केला असून त्यावर आधारित प्रश्नपत्रिकेचा नमुना उत्तरसुचीसह परिषदेच्या 666.े2ूीस्र4ल्ली.्रल्ल या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. इच्छुकांनी येत्या 30 ऑगस्ट र्पयत या आराखड्यावरील आक्षेप व सुधारणा पाठवाव्यात, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)
4नवीन अभ्यासक्रमात सामान्य विज्ञान, इतिहास,भूगोल व नागरिकशास्त्र,गणित, परिसर अभ्यास 2 या विषयांचा समावेश आहे. तर पेपर क्रमांक 2 मध्ये बुध्दीमत्ता चाचणीसह परिसर अभ्यास 2 चा समावेश करण्यात आला आहे.
4इंग्रजी, उर्दू, हिंदी,गुजराती, इंग्रजी,तेलगु,सिंधी व कन्नड या आठही माध्यमांचे पेपर क्रमांक 2 व 3 चे विषयनिहाय गुणनियोजन एकसारखे असेल,असे परिषदेने स्पष्ट केले आहे.