शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

पिंपरी महापालिका प्रशासनाच्या वतीने भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 13:24 IST

भटक्या कुत्र्यांमुळे भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार

ठळक मुद्देमहापालिकेचा उपक्रम : नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी पालिकेने उचलले पाऊलप्राणीमित्र संस्थांनी आक्षेप घेतल्यामुळे भटक्या कुत्र्यांना जिवे मारण्यास बंदी

पिंपरी : शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. ही भटकी कुत्री आटोक्यात आणताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. या कुत्र्यांना ट्रॅक करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा शोध घेणे शक्य होणार आहे.प्राणीमित्र संस्थांनी आक्षेप घेतल्यामुळे भटक्या कुत्र्यांना जिवे मारण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु, या कुत्र्यांकडून नागरिकांच्या जिवाला धोका आहे. यावर नियंत्रण आणले नाही तर भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या मागे हे कुत्रे धावतात. तसेच महिन्यागणिक कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढच होत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत..................रात्रीच्या वेळी उशिरा कामावरून येणाºया कामगारांना हे कुत्रे लक्ष करतात. रस्त्याने जाणाºया प्रवाशी नागरिकांच्या अंगावर ही कुत्री धावून जातात. त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून भटक्या कुत्र्यांना पकडले जाते. पकडलेल्या कुत्र्यांवर नसबंदी करून पुन्हा ते परिसरामध्ये सोडले जातात. मात्र, भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते.पण आता नेमकी संख्या कळणार असल्यामुळे यावर प्रतिबंध करणे शक्य होणार आहे. यात प्रत्येक वेळेस कुत्र्याला पकडताना त्याचा फोटो काढला जाणार आहे. त्याची निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यावर व त्याला पुन्हा सोडून देताना त्याचा फोटो अपलोड केला जाणार आहे. एकदा त्या कुत्र्याचा फोटो अपलोड केला तर दुसºया वेळेस त्याच कुत्र्याचा फोटो सिस्टिम स्वीकारणार नाही. त्यामुळे कुत्र्यांची नेमकी मोजणी व त्यांना पकडणे सोयीस्कर होणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdogकुत्रा