शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

पत अन् प्रतिष्ठेसाठी गावचे कारभारी बदलाचा मुळशी पॅटर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:44 IST

गावागावांत, वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांच्या हातात मुबलक पैसा खेळू लागला. ‘पत आणिप्रतिष्ठा’ याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्याची नवीन पद्धत रूढ

- रोहिदास धुमाळ-  हिंजवडी : मुळशी तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होऊ लागला आहे. यामुळे गावागावांत, वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांच्या हातात मुबलक पैसा खेळू लागला. ‘पत आणि प्रतिष्ठा’ याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच निवडणुकांमध्ये वारेमाप खर्च करून साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा वर करून निवडून यायचे. त्यानंतर वाद होण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या जास्तीत जास्त सदस्यांना सरपंच व उपसरपंच होण्याची संधी देण्याचा नवा मुळशी पॅटर्न सुरू झाला आहे.  सध्या मुळशी परिसरातील राजकीय परिस्थितीत काहीसा बदल होऊ लागला आहे. लोकप्रतिनिधींनी एक पाऊल पुढे टाकत आपापसातील वाद मिटविण्यासाठी नवीन पॅटर्न सुरू केला आहे. विनाकारण वाद नकोत म्हणून निवडून आलेले आपले सदस्य खूश राहण्यासाठी पाच वर्षांत महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी वाटून घेण्याची नवीन पद्धत रूढ केली आहे. मात्र दर चार, सहा महिन्यांनी ग्रामपंचायतीमधील कारभारी बदलत असल्याने याचा थेट फटका गावातील मूलभूत सोयी सुविधांचे व्यवस्थापन व नियोजनबद्ध विकासकामांवर पडत आहे. अधिकार आणि निर्णय प्रक्रियेचे विकेंद्रीकरण होण्यासाठी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था अगदी ग्रामपंचायतपर्यंत विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास जलद गतीने होण्यासाठी सरपंच पाच वर्षांसाठी निवडला जात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी एकत्रितपणे आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी जलदगतीने निर्णय घ्यायचे असतात. मात्र, मुळशी तालुक्यात पत अन् प्रतिष्ठा सर्वांना मिळण्यासाठी सरपंच, उपसरपंचांना आपले अधिकार आणि कर्तव्य याची पूर्ण माहिती होते ना होते तोच कारभारी बदलला जात आहे.वकास प्रक्रियेला अडथळाग्रामपंचायतीचे कारभारी सतत बदलत असल्याने निर्णय प्रक्रियाही बदलत आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. गावाच्या नियोजनबद्ध विकासापेक्षा महत्त्वाची पदे ठराविक कालावधीसाठी आपआपसात वाटून घेत आहेत. महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती ठराविक दिवसांनी सतत बदलत असल्याने पंचायत निर्णय प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. यामुळे कामाचा अप्रत्यक्ष ताण स्थानिक प्रशासनावर पडतो.........शासन निर्णयानुसार आता, सरपंच हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे़ त्यामुळे अशा प्रकाराला चपराक बसेल. मात्र उपसरपंच वारंवार बदलला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध विकासकामात अडचणी निर्माण होतात. विकास कामाला खिळ बसते. - संदीप कोहिनकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग,जि. प. पुणे. 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा