शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

स्मार्ट वॉच पॅटर्नच्या नावाखाली होणाऱ्या सुमारे साडेसहा कोटींच्या लुटीला चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 14:01 IST

नागपूरच्या धर्तीवर महापालिकेत स्मार्ट वॉच घेण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यास सुरूवातीला राष्ट्रवादी  काँग्रेस, शिवसेनेने विरोध दर्शविला होता.

ठळक मुद्देपिंपरी चिचवड महापालिका प्रशासनाचा ‘स्मार्ट वॉच ’विषय स्थायी समितीने फेटाळलाआरोग्य विभागातील कामगारांसाठी वॉच घेण्याचा होता विषय कामचुकार कर्मचारी असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा सक्षम करायला हवी

पिंपरी : स्वच्छ भारत उपक्रमांअंतर्गत सफाई कामगारांना स्मार्ट वॉच खरेदीचा नागपूर पॅटर्नचा घाट प्रशासनाने घातला होता. नागपूर पॅटर्न कसा अपयशी ठरला आहे. हे लोकमतने उघडकीस आणल्यानंतर महापालिकेच्या स्थायी समितीने फेटाळला आहे. त्यामुळे स्मार्ट वॉचच्या नावाखाली होणारी सुमारे साडेसहा कोटींच्या लुटीस चाप बसला आहे.नागपूरच्या धर्तीवर महापालिकेत स्मार्ट वॉच घेण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यास सुरूवातीला राष्ट्रवादी  काँग्रेस, शिवसेनेने विरोध दर्शविला होता. त्यानंतर सत्ताधारी भाजपानेही यात लक्ष घातले. याबाबत लोकमतने सर्वप्रथम वृत्त शहरवासियांसमोर आणले होते.सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम व सफाई कर्मचारी, घंटागाडी ठेकेदार, स्वच्छताविषयक ठेकेदारांकडील आरोग्य कामगारांसाठी ४ हजार ५४४ स्मार्ट वॉच आयटीआय, बेंगलोर या संस्थेकडून थेट पद्धतीने घेण्यात येणार आहेत. चार वर्षांसाठी प्रत्येक वॉचसाठी दरमहा रुपये २८७ आणि जीएसटीसह दरमहा सुमारे १३ लाख १२८ रुपये, एक वषार्साठी एकूण रुपये १ कोटी ५६ लाख ४९ हजार तर चार वर्षांसाठी एकूण ६ कोटी २५ लाख ९८ हजार या खर्चास मान्यता मिळावी, यासाठी प्रशासाने विषय पत्र स्थायी समितीसमोर ठेवले होते. याप्रकरणाचा पोलखोल करून नागपूरमध्ये ही योजना कशी अपयशी ठरली होती. यावर लोकमतने प्रकाश टाकला होता. केवळ या घड्याळाचा उपयोग हजेरीसाठी होत असल्याने आणि त्यातील त्रुटीवर प्रकाश टाकला होता. निविदाप्रक्रिया न राबविता थेटपद्धतीने घड्याळ भाड्याने घेण्याचे गौंडबंगाल काय? असाही प्रश्न उपस्थित केला होता. मागील आठवड्यातील स्थायी समितीच्या सभेत हा विषय तहकूब ठेवण्यात आला होता. बुधवारची सभा तहकूब करण्यात आली होती. शुक्रवारच्या सभेत यावर काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता होती. आजच्या सभेत या विषयावर चर्चा झाली. लोकमतने उपस्थित केलेले प्रश्न सदस्यांनी विचारले. स्मार्ट वॉचच्या थेट खरेदीवरून टीका होत असल्याने हा विषय फेटाळण्यात आला आहे. याबाबत सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, आरोग्य विभागातील कामगारांसाठी वॉच घेण्याचा विषय होता. त्यातून केवळ हजेरीच लक्षात येईल, तसेच थेटपणे खरेदी आणि भाड्याने घड्याळ कशासाठी? यावरही सदस्यांचा आक्षेप होता. कामचुकार कर्मचारी असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा सक्षम करायला हवी. त्यावर सहा कोटी कशासाठी? असाही प्रश्न उपस्थित झाला म्हणून विषय फेटाळला आहे.

टॅग्स :PuneपुणेnagpurनागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानshravan hardikarश्रावण हर्डिकर