चऱ्होलीत राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा

By Admin | Updated: February 13, 2017 01:49 IST2017-02-13T01:49:17+5:302017-02-13T01:49:17+5:30

चऱ्होलीत प्रभाग क्र. ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात उमेदवार विनयाताई तापकीर, संजय पठारे

NCP's footsteps in Charholi | चऱ्होलीत राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा

चऱ्होलीत राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा

मोशी : चऱ्होलीत प्रभाग क्र. ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात उमेदवार विनयाताई तापकीर, संजय पठारे, घनश्याम खेडकर, मंदाताई आल्हाट सहभागी झाले होते. या वेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.
प्रभाग क्र. ३ मधून प्रचार फेरी काढण्यात आली. या वेळी उमेदवार घनश्याम खेडकर, मंदाताई आल्हाट, विनयाताई तापकीर आणि संजय पठारे उपस्थित होते.
चऱ्होली गावठाण, बाजारपेठ परिसरात निघालेल्या पदयात्रेत स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दिला. ‘‘राष्ट्रवादीने विकास केला आहे. विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादीच्या उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असे मत उमेदवारांनी व्यक्त केले.
या वेळी प्रवीण काळजे, बाबासाहेब तापकीर, पोपटराव पठारे, अनिल भोसले, नवनाथ तापकीर, श्रीकांत तापकीर, राघुतात्या पठारे, किसन गाडेकर, कांताराम बुर्डे, उल्हास काटे, महेश काकडे, अप्पासाहेब भोसले, गणेश भोसले या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मतदार बंधू-भगिनी उपस्थित होत्या. (वार्ताहर)

Web Title: NCP's footsteps in Charholi