शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी कपातीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे घंटानाद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 18:22 IST

पाणी कपातीच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनासमोर घंटानाद आंदोलन केले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला.

पिंपरी : पाणी कपातीच्या निषेर्धात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका भवनासमोर घंटानाद आंदोलन केले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध केला.महापालिका भवनासमोरील आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे,  युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, नगरसेवक माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने, भाऊसाहेब भोईर, महिला अध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर, मंगलाताई कदम, पक्ष प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.वाघेरे म्हणाले, ‘‘पवना धरण शंभर टक्के भरले असतांनाही प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे व टँकर लॉबीच्या भल्यासाठी एक दिवसाआड पाणी पुरवठा करुन शहरातील नागरिकांना वेठीस धरले जात आहे. प्रशासनास याबाबत वारंवार निवेदने, अर्ज देण्यात आली आहेत. आंदोलने केली आहेत. परंतु अद्यापही नियमित पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. शहरात अनाधिकृत नळकनेक्शन रोजरोस होत आहेत. पाण्याची चोरी होत आहे परंतु त्यांच्याकडे प्रशासन सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहे. बाकीची इतर हास्यास्पद कारणे देऊन  कृत्रिम पाणी टंचाई करत आहे. त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी  आंदोलन केले.प्रशासनाच्यावतीने पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी निवदेन स्वीकारले व आठ दिवसात पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले. एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वाघेरे यांनी दिला.

टॅग्स :water shortageपाणीकपातNCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड