वृक्ष समितीसाठी राष्ट्रवादीला धक्का

By Admin | Updated: July 19, 2014 03:22 IST2014-07-19T03:22:38+5:302014-07-19T03:22:38+5:30

महापालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीच्या सदस्य निवडीमध्ये ऐन वेळी काँग्रेसच्या सदस्यांनी युतीचे उमेदवार नंदकिशोर मंडोरा यांना पाठिंबा दिला

Nationalist push for tree committee | वृक्ष समितीसाठी राष्ट्रवादीला धक्का

वृक्ष समितीसाठी राष्ट्रवादीला धक्का

पुणे : महापालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीच्या सदस्य निवडीमध्ये ऐन वेळी काँग्रेसच्या सदस्यांनी युतीचे उमेदवार नंदकिशोर मंडोरा यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार हाजी नदाफ यांचा पराभव झाला.
वृक्षसंवर्धन समितीचे सदस्य सुधीर नाईक यांनी पात्रतेसाठी खोटी कागदपत्रे दिल्याचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नाईक यांचे सदस्यत्व रद्द केले. यामुळे रिकाम्या झालेल्या एका जागेसाठी सदस्यांची बैठक झाली. त्या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसकडून हाजी नदाफ तर भाजप-शिवसेना युतीकडून नंदकिशोर मंडोरा यांची नावे होती. मात्र, ऐन वेळी काँग्रेसचे कमल व्यवहारे व मुकारी अलगुडे यांनी युतीचे उमेदवार मंडोरा यांना पाठिंबा दिला. त्यामुळे युतीचे उमेदवार मंडोरा विजयी झाले, तर राष्ट्रवादीचे हाजी नदाफ यांचा पराभव झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Nationalist push for tree committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.