सुपे येथे दलितवस्त्यांना महापुरुषांची नावे
By Admin | Updated: June 9, 2016 01:30 IST2016-06-09T01:30:12+5:302016-06-09T01:30:12+5:30
येथील मातंगवस्तीला अण्णा भाऊ साठेनगर असे नाव देण्यात आले.

सुपे येथे दलितवस्त्यांना महापुरुषांची नावे
सुपे : येथील मातंगवस्तीला अण्णा भाऊ साठेनगर असे नाव देण्यात आले. या नामफलकाचे अनावरण येथील सरपंच दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वर्षी राज्य शासनाने दलितवस्त्यांना जातिनिहाय नावांचा उल्लेख न करण्याचा आदेश काढला होता. जातिनिहाय नावाचा उल्लेख न करता महापुरुषांची नावे देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या नामफलकाचे अनावरण ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच करण्यात आले. येथील मातंगवस्तीला अण्णा भाऊ साठेनगर तसेच बौद्धवस्तीला सिद्धार्थनगर, तर चर्मकारवस्तीला रोहिदासनगर अशी नावे ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहेत.