शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

बंद पडलेली नागपूरची स्मार्ट वॉच योजना थेट पद्धतीने राबविण्याचा घाट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 19:51 IST

कोणतीही निविदाप्रक्रिया न करता सुमारे पावणेसहा कोटींची चार हजार ५४४ स्मार्ट वॉच खरेदी केली जाणार आहेत.

ठळक मुद्देस्मार्ट वॉच योजना राबविण्याचा घाट म्हणजे जनतेच्या पैशांची लूट असा आरोप सफाई कामगारांच्या मनगटावर बांधण्यात येणारी चार हजार ५४४ स्मार्ट वॉच खरेदीचा निर्णय सेवाकरांसाठी द्यावे लागणार तेरा लाख दर महिना एका घड्याळासाठी दरमहा २८७ अधिक वस्तू व सेवाकर अदा करावा लागणार

पिंपरी : शहरातील कचरा समस्येचे तीन तेरा वाजले असताना महापालिकेचे स्वच्छ भारत अंतर्गत स्मार्ट लूट करण्याचे धोरण आहे. कोणतीही निविदाप्रक्रिया न करता सुमारे पावणेसहा कोटींची चार हजार ५४४ स्मार्ट वॉच खरेदी केली जाणार आहेत. नागपूरमध्ये बंद पडलेली स्मार्ट वॉच योजना राबविण्याचा घाट प्रशासनाचा असून, थेट पद्धतीने खरेदी करून जनतेच्या पैशांची लूट होत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निष्क्रिय प्रशासनामुळे स्वच्छ भारत अभियानात शहराची पिछाडी होत आहे. नऊवरून ४३ व्या क्रमांकावर महापालिका फेकली गेली आहे. शहर स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होण्यासाठी महापालिकेने सात कोटी खर्चून सफाई कामगारांच्या मनगटावर बांधण्यात येणारी चार हजार ५४४ स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका सेवेतील १ हजार ८४५ कामगार, ३०५ घंटागाडी कामगार आणि ठेकेदारांकडील दोन हजार ३९४ कामगारांना ह्यस्मार्ट वॉचह्ण घालणे बंधनकारक असेल. जानेवारी २०१९ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण होणार असल्याने तातडीची बाब म्हणून स्मार्ट वॉच थेट पद्धतीने खरेदी करावीत, अशी गळ आरोग्य विभागाच्या सहायक आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना घातली आहे.महापालिकेचे क्षेत्रफळ १८१ चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारलेले आहे. दैनंदिन साफसफाई, रस्ते स्वच्छता, कीटकनाशक फवारणी, नालेसफाई, कचरा संकलन आणि वाहतूक, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता आदी कामे आरोग्य विभागामार्फ त केली जातात. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय कामगार नेमले आहेत. त्यात सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मलेरिया निरीक्षक, वाहनचालक, आरोग्य सहायक, मुकादम, गटरकुली, सफाई कामगार, सेवक, कचराकुली, मजूर, स्पे्र कुली, कंपोस्टकुली, शिपाई अशा १८०० कामगारांचा समावेश आहे.कंत्राटदारांवरच महापालिकेची भिस्त साफसफाईसाठी महापालिकेने कंत्राटदार नेमले आहेत. कचरासंकलन, वहन, रस्तेसफाई, नालेसफाई, झाडलोट, सार्वजनिक स्वच्छतागृहांची कामे कंत्राटदारांकडून केली जात आहेत. कोट्यवधींचा खर्च करूनही कचरा समस्या सुटलेली नाही. कचरा वाहतूक वाहनांवर ह्यजीपीएसह्ण लावले आहे. आता कामचुकार सफाई कामगारांना प्रशासनाने लक्ष्य केले आहे. सर्व स्वच्छता कामगारांवर, आरोग्य निरीक्षकांवर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट वॉचची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ४५४४ नगांची खरेदी करण्यात येणार आहे.सहा महिन्यांपूर्वीच झाली होती चर्चाकचºयाच्या प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले असता, त्या वेळी नियंत्रणासाठी स्मार्ट वॉच घेण्याचे आयुक्तांना सांगितले होते. त्यानंतर निविदाप्रक्रिया राबविणे अपेक्षित होते. मात्र, ठरावीक कंपनीला डोळ्यांसमोर ठेवून वॉच खरेदीचा घाट घातला जात आहे. नागपूरमध्ये अयशस्वी ठरलेला प्रकल्प राबविण्याचा घाट कशासाठी घातला जातोय, ठेकेदार पोसण्याचे काम महापालिका प्रशासन करीत नाहीत ना, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. थेट पद्धतीने काम देण्याचा घाटपारदर्शकतेचे ढोल बडविणाºया महापालिकेत थेट पद्धतीने आपल्याच ठेकेदारांना काम देण्याचे महापालिका प्रशासनाचे ध्येय असल्याचे दिसून येते. आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांना ह्यस्मार्ट वॉचह्णखरेदीला कमालीची घाई झाली आहे. नागपूर महापालिकेच्या धर्तीवर स्मार्ट वॉच थेट पद्धतीने खरेदी करावेत, अशी विनंती आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे. विविध विकासकामांत सल्लागारांचा नागपूर पॅटर्न आणण्यात आग्रही असणाऱ्या आयुक्तांनी तातडीची बाब म्हणून सात कोटी रुपयांच्या घड्याळ खरेदीला मान्यता दिली. सेवाकरांसाठी द्यावे लागणार तेरा लाख दर महिना आयटीआय लिमिटेड या कंपनीकडून थेट पद्धतीने घड्याळ खरेदी केली जाणार आहे. एका घड्याळासाठी दरमहा २८७ अधिक वस्तू व सेवाकर अदा करावा लागणार आहे. ४ हजार ५४४ घड्याळांसाठी दरमहा १३ लाख ४ हजार १२८ अधिक वस्तू व सेवाकर, तर वषार्काठी १ कोटी ५६ लाख ४९ हजार ५३६ अधिक वस्तू व सेवा कर देण्यात येणार आहे. चार वर्षांसाठी ही घड्याळे घेतली जाणार असून, तब्बल सात कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. थेट पद्धतीने काम देण्याचा घाट महापालिका प्रशसानाने घातला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड